मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

उल्हासनगरात मोठा राजकीय भूकंप होणार, 22 नगरसेवक राष्ट्रवादीत करणार प्रवेश

उल्हासनगरात मोठा राजकीय भूकंप होणार, 22 नगरसेवक राष्ट्रवादीत करणार प्रवेश

उल्हासनगरात राजकीय भूकंप; भाजपला मोठा झटका, 22 नगरसेवक राष्ट्रवादीच्या गळाला

उल्हासनगरात राजकीय भूकंप; भाजपला मोठा झटका, 22 नगरसेवक राष्ट्रवादीच्या गळाला

22 नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ आपल्या हाती बांधणार आहेत. हे सर्व 22 नगरसेवक आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याने भाजपला मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे.

उल्हासनगर, 27 नगरसेवक : उल्हानसनगरात (Ulhasnagar) राजकीय भूकंप होणार असल्याचं दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टीम ओमी कलानीतील (omie kalani) 22 नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ आपल्या हाती बांधणार आहेत. हे सर्व 22 नगरसेवक आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं कळत आहे. ओमी कलानी यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे भाजपला मोठा झटका बसला आहे.

कारागृहात असलेले पप्पू कलानी पेरोलवर बाहेर आले आहेत. कारागृहातून पप्पू कलानी बाहेर येताच राजकीय गाठीभेटी सुरू झाल्या आहेत. नुकतीच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उल्हासनगरात जाऊन पप्पू कलानी यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता टीम ओमी कलानीतील 22 नगरसेवक हे राष्ट्रवादीत सहभागी होत आहेत. मात्र, भाजपने हा दावा फेटाळून लावत हे नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार नसल्याचं म्हटलं आहे.

उल्हासनगरात कलानी कुटुंबाचे मोठे राजकीय वर्चस्व आहे. पप्पू कलानी हे स्वत: चार वेळा आमदारपदी निवडून आले होते. तर त्यांची पत्नी ज्योती कलानी या देखील आमदार होत्या. काही दिवसांपूर्वीच ज्योती कलानी यांचे निधन झाले आहे. ज्योती कलानी यांनी उल्हासनगर महानगरपालिकेचं महापौरपदही भूषवलं होतं.

आता पप्पू कलानी पेरोलवर बाहेर येताच पुन्हा राजकीय वातावरणात सक्रीय झाले आहेत. त्यांनी नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. पप्पू कलानी यांचा मुलगा ओमी कलानी हा राजकारणात खूपच सक्रीय आहे तर सून पंचम कलानी या देखील नगरसेविका आहेत.

गेल्या तीन वर्षांपासून ओमी कलानीने भाजपसोबत आघाडी करत घरोबा केला होता. नंतर शिवसेनेसोबतही जवळीक झाली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पक्षांपासून ओमी कलानी हे दूर झाले आहेत. त्यानंतर आता ओमी कलानी यांनी आपल्या पक्षाचे 22 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याचं म्हटलं आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीत याचा मोठा फायदा राष्ट्रवादीला होणार हे निश्चित आहे.

काही दिवसांपूर्वी ज्योती कलानी यांचं निधन

उल्हासनगर शहरात राजकीय दबदबा असणाऱ्या ज्योती कलानी (Jyoti Kalani) यांचं 18 एप्रिल 2021 रोजी सायंकाळी हृदय विकाराच्या झटक्याने निधन (Jyoti Kalani passes away) झालं. त्यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना तात्काळ उल्हासनगरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यांची प्राणज्योत मालवली. त्या 65 वर्षांच्या होत्या. उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी तीनवेळा विजय मिळवला होता.

ज्योती कलानी यांनी उल्हासनगर महापालिकेत नगरसेवक पदापासून राजकीय प्रवासाला सुरुवात केली त्यानंतर स्थायी समिती सभापती, महापौर व आमदार अशी पद त्यांनी भूषवली. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

First published:

Tags: BJP, Ulhasnagar