कोपर्डी प्रकरणी उज्ज्वल निकमांची साक्ष घ्या, बचाव पक्षाची मागणी

कोपर्डी प्रकरणी उज्ज्वल निकमांची साक्ष घ्या, बचाव पक्षाची मागणी

बचाव पक्षाचे वकील बाळासाहेब खोपडे यांनी कोर्टात साक्षीदारांची यादी सादर केली. या यादीत उज्ज्वल निकम यांचंही नाव होतं.

  • Share this:

22 जून : कोपर्डी खून खटल्यात बचाव पक्षानं  विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची साक्ष तपासण्याची मागणी  धक्कादायक मागणी केलीये.

बचाव पक्षाचे वकील बाळासाहेब खोपडे यांनी कोर्टात साक्षीदारांची यादी सादर केली. या यादीत उज्ज्वल निकम यांचंही नाव होतं. कोपर्डी सामूहिक बलात्कार आणि खून खटल्यात उज्ज्वल निकम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास झाला या गोष्टीला बचाव पक्षाचा आक्षेप आहे.

खटला उभा राहिल्यानंतर सरकारी वकिलांचं काम सुरू होतं. पण या खटल्यात तसं झालं नसल्याचा दावा बाळासाहेब खोपडेंनी केलाय. आता कोर्ट यावर काय निर्णय देतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय न्यायदानाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका सरकारी वकिलांची साक्ष तपासण्याची मागणी करण्यात आलीये.

First published: June 22, 2017, 10:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading