पाकनं कुलभूषण जाधवांची हत्याही केली असू शकते - उज्ज्वल निकम

पाकनं कुलभूषण जाधवांची हत्याही केली असू शकते - उज्ज्वल निकम

  • Share this:

16 एप्रिल :  कुलभूषण जाधव यांची पाकिस्तानने हत्या केली असावी, म्हणूनच भारताच्या प्रतिनिधीला त्यांना भेटू दिल जात नसल्याची, भीती ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केली. खोटा कबुलीजबाब देण्यासाठी जाधव यांच्यावर इंजेक्शन वापरली गेली असल्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

हेरगिरीच्या आरोपाखाली भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. त्यावर ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी पाकिस्तानवर जोरदार टीका केली आहे. पाकिस्तानी पंतप्रधानांचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार सरताज अझीझ यांनी कुलभूषण जाधव यांना कुणालाही भेटू दिले जाणार नाही, असं जाहीर केलं आहे. पाकिस्तानी कायद्यानुसार परदेशी हेराला कुणालाही भेटू देण्याची तरतूद नाही. ही पाकिस्तानची भूमिका अत्यंत खोडसाळ, बेकायदेशीर आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग करणारी आहे, असंही उज्ज्वल निकम म्हणाले.

कुलभूषण जाधव यांचा कबुली जबाब घेतला असेल तर तो बळजबरीने घेतल्याची शक्यता आहे. त्यांना कुणालाही भेटू दिले जात नाही. तशी परवानगीच दिलेली नाही. याचे दोन अनुमान निघतात. जाधव यांचा तथाकथित जबाब हा पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांकडून क्रूरतेने हाल करून घेतल्याची शक्यता आहे. जाधव यांना कुणी भेटल्यास ही बाब उघड होण्याची भीती पाकिस्तानला वाटते आहे. पाकिस्तानी कायद्यानुसार कुठल्याही गुन्हेगाराचा कबुली जबाब मारहाण करून किंवा आमिष दाखवून घेतला असेल तर तो ग्राह्य मानला जात नाही. त्यामुळे पाकिस्तानकडून लपवाछपवी केली जात आहे, असंही निकम यांनी सांगितले. कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणात भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर जनमत तयार करून पाकिस्तानवर दडपण आणावे लागेल, असंही त्यांनी सांगितलं आहे.

First published: April 16, 2017, 7:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading