मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

उजणी आंदोलनाची धग शरद पवारांच्या गोंविदबागेपर्यंत, निवास्थानाची सुरक्षा वाढवली

उजणी आंदोलनाची धग शरद पवारांच्या गोंविदबागेपर्यंत, निवास्थानाची सुरक्षा वाढवली

तर बारामतीमधील राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग सोसायटी  येथील ठिकाणी देखील सुरक्षा वाढवली.

तर बारामतीमधील राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग सोसायटी येथील ठिकाणी देखील सुरक्षा वाढवली.

तर बारामतीमधील राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग सोसायटी येथील ठिकाणी देखील सुरक्षा वाढवली.

बारामती, 26 मे: पश्चिम महाराष्ट्रात उजनीच्या पाणी प्रश्नावरून (Ujani Water Dispute) संघर्ष पेटला आहे. या आंदोलनाची धग आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांच्या निवास्थानापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे गोविंदबाग आणि अजित पवार यांच्या निवास्थानाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

उजनी धरणातून इंदापूरला 5 टीएमसी पाणी वळवण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. पण, सोलापूरमध्ये आंदोलनाचा भडका उडाला आहे.  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामतीतील गोविंद बाग या निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. उजनीच्या पाणी प्रश्नी सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आंदोलन करणार होते. पोलिसांनी आधीच कारवाई करत तीन आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.

तर बारामतीमधील राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग सोसायटी  येथील ठिकाणी देखील सुरक्षा वाढवली.

HBD:50 रुपये कमावणारे जेठालाल आज एका एपिसोडसाठी घेतात इतके पैसे

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उजनी धरणातून इंदापूरला 5 टीएमसी पाणी वळवण्याचा निर्णय रद्द करण्याची घोषणा केली. मात्र जोपर्यंत तसा अध्यादेश निघत नाही तोपर्यंत सोलापूर जिल्ह्यात आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीने दिला. त्यानुसार, उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या अतुल खुपसे, माऊली हाळनवर व दीपक वाडदेकर यांच्या समवेत शेकडो शेतकऱ्यांनी सोमवारी आंदोलन केलं. आंदोलकांनी पंढरपूर-सातारा रस्ता अडवला होता. या मार्गावर टायर जाळत आंदोलकांनी या निर्णयाचा निषेध व्यक्त केला.

उजनी धरणातील 5 टीएमसी पाण्यावरून सध्या पुणे विरुद्ध सोलापूर जिल्हा असा संघर्ष पेटला आहे. सोलापूर जिल्ह्यानं इंदापूरला हे पाणी वळवण्याच्या निर्णयाचा तीव्र विरोध केला आहे. सोलापूरमधील काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे, शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांनीदेखिल या निर्णयाला विरोध केला होता. तसंच संघर्ष समितीनं देखील याविरोधात तीव्र आंदोलन सुरू केलं.

आईला का मारलं, मुलाने बापावर कोयत्याने केले सपासप वार, बीड हादरलं!

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांचा इंदापूर हा मतदारसंघ आहे. त्यांनी उजनीचं पाणी इंदापूरला पळवल्याचा आरोप सध्या केला जात आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तोंडी आदेश देत हा निर्णय रद्द केला आहे. मात्र तरीही आंदोलक अध्यादेश येईपर्यंत आंदोलनाच्या निर्णयावर ठाम आहेत.

First published:

Tags: Baramati, Sharad pawar