उदयनराजे आणि रामराजे यांच्यात पुन्हा वाकयुद्ध, विश्रामगृहात आमने-सामने

उदयनराजे आणि रामराजे यांच्यात पुन्हा वाकयुद्ध, विश्रामगृहात आमने-सामने

साताऱ्यात काल उदयनराजे आणि रामराजे नाईक यांच्यात पुन्हा तणाव निर्माण झाला होता.

  • Share this:

सातारा, 27 जून : साताऱ्यात काल उदयनराजे आणि रामराजे नाईक यांच्यात पुन्हा तणाव निर्माण झाला होता. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे साताऱ्यातील विश्रामगृहात बसलेले असतानाच त्या ठिकाणी खासदार उदयनराजे भोसले येताच काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पण जिल्हा पोलीसप्रमुख संदीप पाटील यांनी वेळीच मध्यस्थी केल्याने मोठा संघर्ष टळला. या दोघांमध्ये सध्या सातारच्या राजकारणावरून वाकयुद्ध सुरू आहे. काल जिल्हा बँकेतील बैठक संपल्यानंतर विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे साताऱ्यातील विश्रामगृहात थांबले होते.

हेही वाचा...

'आपले मुख्यमंत्री म्हणजे भोळे सांब, निष्ठावान सेवक', सामानातून मुख्यमंत्र्यांबाबत व्यक्त केली चिंता

याची माहिती मिळाल्यानंतर खा. उदयनराजे भोसले त्या ठिकाणी आले. रामराजे नाईक निंबाळकर ज्या सूट मध्ये बसलेले होते त्या सूटकडे खासदार उदयनराजे निघाले होते.

मात्र या दोघात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला वाद लक्षात घेता पोलीस प्रमुख संदीप पाटील यांनी मध्यस्थी करत उदयनराजे यांना वाहनात बसवले आणि सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला.

पण दरम्यान या सगळ्या प्रकारानंतर काही वेळा साठी विश्रामगृहावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

हेही वाचा...

बोंडअळी प्रतिबंधक माहितीसाठी शेतकऱ्यांना व्हॉट्सअॅप अलर्ट !

झारखंडमध्ये मोठा नक्षलवादी हल्ला, 6 जवान शहीद

आदेशाच पालन करा, नाहीतर...! 'या' मुद्द्यावर हायकोर्टाने राज्यभरातील महापालिकांना ठणकावलं

First published: June 27, 2018, 8:53 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading