'आमचं ठरलंय' : उद्धव ठाकरेंनी नेमंक काय केलं जाहीर?

'आमचं ठरलंय' : उद्धव ठाकरेंनी नेमंक काय केलं जाहीर?

कोल्हापूरमध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या धामधुमीत 'आमचं ठरलंय' हे वाक्य खूपच गाजलं. त्याच वाक्याचा आधार घेत उद्धव ठाकरेंनीही जागावाटपाबद्दल वक्तव्य केलं.

  • Share this:

संदीप राजगोळकर

कोल्हापूर, 6 जून : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी कोल्हापूरमध्ये अंबाबाईचं दर्शन घेतलं. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय आणि नव्याने निवडून आलेले खासदारही होते. अंबाबाईचं दर्शन घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली.

शिवसेना आणि भाजप युतीची विधानसभेसाठीची रणनीती ठरलेली आहे. योग्य वेळ आल्यावर आम्ही ती जाहीर करू, असं उद्धव ठाकरे म्हणाले. कोल्हापूरमध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या धामधुमीत 'आमचं ठरलंय' हे वाक्य खूपच गाजलं. त्याच वाक्याचा आधार घेत उद्धव ठाकरेंनीही जागावाटपाबद्दल वक्तव्य केलं.

भाजप आणि शिवसेनेमधल्या जागावाटपाबद्दल, 'आमचं ठरलंय' एवढ्या मोजक्या शब्दात उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं. या पत्रकार परिषदेला महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हेही उपस्थित होते.

दुष्काळी दौरा करणार

येत्या रविवारपासून आपण मराठवाडा आणि विदर्भातल्या काही ठिकाणी दुष्काळी दौरा करणार आहोत, असं उद्धव ठाकरे म्हणाले. युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हेही त्यांच्यासोबत असणार आहेत.

शिवसेनेला फक्त अवजड उद्योग खातं मिळालं म्हणून शिवसेना नाराज आहे का, असाही प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला. त्यावर आमच्या चेहऱ्यावर कुठे नाराजी दिसते का ? असा उलटा सवाल त्यांनी केला.

अयोध्येलाही जाणार

शिवसेनेला लोकसभेचं उपाध्यक्षपद मिळणार का हाही प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर, भाजपशी आम्ही पदांसाठी नाही तर हिंदुत्वासाठी युती केली आहे, असं त्यांनी सांगितलं. एखादं मनोगत व्यक्त करणं म्हणजे नाराजी नाही हे स्पष्टीकरणही त्यांनी दिलं. जे हवं आहे ते हक्काने मागू, असं ते म्हणाले.

16 जूनच्या सुमाराला आपण अयोध्येचा दौरा करणार आहोत, असंही उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं.

===============================================================================================

'जय भवानी, जय शिवाजी' च्या जयघोषानं रायगड दुमदुमला

First published: June 6, 2019, 4:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading