महाराष्ट्राचा महासंग्राम : उदगीरमध्ये भाजपमधल्या गटबाजीमुळे नुकसान होणार?

लातूर जिल्ह्यातला उदगीर मतदारसंघ राखीव आहे. तेव्हापासून भाजपाने ही जागा स्वत:च्या ताब्यात ठेवली आहे. आता मात्र भाजपतल्या गटबाजीमुळे इथे नुकसान होण्याची शक्यता आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 21, 2019 08:09 PM IST

महाराष्ट्राचा महासंग्राम : उदगीरमध्ये भाजपमधल्या गटबाजीमुळे नुकसान होणार?

लातूर, 21 सप्टेंबर : लातूर जिल्ह्यातला उदगीर मतदारसंघ राखीव आहे. तेव्हापासून भाजपाने ही जागा स्वत:च्या ताब्यात ठेवली आहे. भाजपाचे आमदार सुधाकर भालेराव यांना मागच्या दोन्ही वेळेला इथून विजय मिळाला. 2014 मध्ये भाजप अंतर्गत गटबाजीमुळे नाराजी असली तरी मोदी लाटेचा प्रभाव, राष्ट्रवादीची फाटाफूट, काँग्रेसमधील विस्कळीतपणाचा लाभ सुधाकर भालेराव यांना मिळाला. यावेळी मात्र ही शक्यता कमी आहे.

भाजपातले अनेक गट-तट आमदारांच्या विरोधात सक्रिय झाले आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत त्याचं खुलं प्रदर्शनही झालं. राष्ट्रवादीच्या आशा यामुळे पल्लवित झाल्या आहेत. मात्र राज्यात राष्ट्रवादीची झालेल्या वाताहतीचा काहीसा परिणाम या मतदारसंघावरही होतोय.

दलित मतदारांचं वर्चस्व

इथे दलित मतदारांचं वर्चस्व असल्यामुळे वंचित बहुजन आघाडीलाही मोठ्या अपेक्षा आहेत. मात्र, स्वतःच्या ताकदीवर विजय नोंदवू शकेल असा उमेदवार इथे नाही.

रोजगाराच्या शोधात या भागातून मोठ्या प्रमाणावर बेरोजगारांचे लोंढे हे मुंबई, पुणे, हैदराबाद, बंगलोरकडे जाताना दिसत आहेत. रस्ते, पाणी, वीज, शैक्षणिक, आरोग्यविषयक सोयी-सुविधा, व्यापार, उदयोग, कारखानदारीच्या अभावाने उदगीर हा लातूर जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असूनही अतिशय वाईट अवस्थेत आहे. वाढत्या बेरोजगारीकडे कोणाचेही लक्ष नाही.हे मुद्दे इथल्या निवडणुकीत महत्त्वाचे ठरणार आहेत.

Loading...

2014 विधानसभा निवडणूक निकाल

सुधाकर भालेराव, भाजप - 66 हजार 687

संजय बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेस - 41 हजार 800

नारायण राणेंच्या पक्षातील या नेत्याने 'मातोश्री'वर जाऊन बांधले 'शिवबंधन'

=====================================================================================

VIDEO: 'वाघासमोर तुकडा फेकलाय', अमोल कोल्हेंची शिवसेनेवर जहरी टीका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 21, 2019 08:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...