उद्धव ठाकरे आणि नारायण राणे एकाच व्यासपीठावर

उद्धव ठाकरे आणि नारायण राणे एकाच व्यासपीठावर

हा योग जुळून आलाय तो मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण भूमिपूजन कार्यक्रमात. २३ जूनला सकाळी ११ च्या सुमारास सिंधुदूर्गात कुडाळ इथे हा भूमीपूजन कार्यक्रम होणार आहे.

  • Share this:

21 जून : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते नारायण राणे चक्क एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे. हा योग जुळून आलाय तो मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण भूमिपूजन कार्यक्रमात. २३ जूनला सकाळी ११ च्या सुमारास सिंधुदूर्गात कुडाळ इथे हा भूमीपूजन कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित रहाणार आहेत.

राजशिष्टाचारानुसार जिल्ह्यातील स्थानिक आमदार म्हणून नितेश राणे आणि विधान परिषद आमदार नारायण राणे यांनाही याच कार्यक्रामाचं निमंत्रण आहे. नारायण राणे यांचे नितीन गडकरी यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध असल्यामुळे त्यांचा या कार्यक्रमात समावेश करण्यात आल्याचं सूत्रांकडून समजतंय.

पण एकाच व्यासपीठावर उद्धव ठाकरे आणि नारायण राणे येणार का...? आणि आले तर मात्र पोलिसांसमोर कायदा-सुव्यवस्था राखण्याचं मोठं आव्हान असणार आहे. कारण एकाच ठिकाणी मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि राणे समर्थक आले तर तळ कोकणात राजकीय शिमगा पहायला मिळेल एवढं मात्र नक्की.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 21, 2017 02:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading