निवडणूक प्रचारात उद्धव ठाकरेंचं ताळतंत्र सुटलं, भाजपविरोधात बोलताना 'भ'ची भाषा

निवडणूक प्रचारात उद्धव ठाकरेंचं ताळतंत्र सुटलं, भाजपविरोधात बोलताना 'भ'ची भाषा

एरव्ही संयमी नेते अशी ओळख असलेल्या उद्धव ठाकरेंचीही भाषेची पातळी घसरलीये. नांदेड महापालिकेच्या प्रचारसभेत त्यांनी भाजपचे मंत्री आणि आमदार प्रतापराव चिखलीकरांसाठी 'भ'ची भाषा वापरली.

  • Share this:

नांदेड, 08 आॅक्टोबर : एरव्ही संयमी नेते अशी ओळख असलेल्या उद्धव ठाकरेंचीही भाषेची पातळी घसरलीये. नांदेड महापालिकेच्या प्रचारसभेत त्यांनी भाजपचे मंत्री आणि आमदार प्रतापराव चिखलीकरांसाठी 'भ'ची भाषा वापरली. स्वतःला नांदेडमध्ये उमेदवार देता येत नाही म्हणून दुसऱ्या लोकांना घेऊन अंगावर येता का असं सांगताना त्यांनी असंसदीय शब्दाचा वापर केला.

शिवाय वीज टंचाई आणि कोळसा टंचाईवर बोलताना मंत्र्यांना नियोजन करता येत नाही का असा सवाल विचारतानाच त्यांनी पुन्हा असंसदीय शब्दाचा वापर केला. भाजप आणि शिवसेनेत थोडीशी मैत्री अजून शिल्लक असल्याचं सांगत त्यांनी जगातल्या सर्वात मोठ्या पक्षाला आता मंगळावरूनही सदस्यत्वासाठी मिस कॉल येत असल्याचा टोला त्यांनी लगावला.

पहा उद्धव ठाकरेंचं पूर्ण भाषण

First published: October 8, 2017, 8:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading