नाणार दिलं नाही, घेऊ देणार नाही- उद्धव ठाकरे

नाणार दिलं नाही, घेऊ देणार नाही- उद्धव ठाकरे

नाणारमध्ये उद्धव ठाकरेंची जाहीर सभा पार पडली.सभेदरम्यान उद्धव ठाकरेंनी भाजपा पक्षावर जोरदार हल्ला चढवला.

  • Share this:

23 एप्रिल : कोणत्याही परिस्थितीत नाणार प्रकल्प होऊ देणार नाही, अशी गर्जना आज उद्धव ठाकरेंनी नाणारमध्ये केली. प्रकल्पासाठीची एमआयडीसीची अधिसूचना रद्द केली आहे, अशी घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी केली. आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीस आणि पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला दिल्लीत कवडीची किंमत नाही, असं उद्धव म्हणाले. हवं तर प्रकल्प गुजरातला किंवा नागपूरला न्या, आमचं काही म्हणणं नाही, मी कोकणाचा गुजरात होऊ देणार नाही, असंही ते म्हणाले.

उद्धव ठाकरेंच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे

भाजपा म्हणजे अच्छे दिनची स्वप्न दाखवणारे व्हिलन. कोकणची राखरांगोळी करायला निघालेत.

शहा मोदी हे लोक जमीन खरेदीला आलीच कशी?

पैशाची मस्ती इकडे चालणार नाही

शिवरायांचा मावळा विकला जाऊ शकत नाही

कोकणाचं गुजरात होऊ देणार नाही

नागपूरला होणार असेल तर जरूर करा . विदर्भाचा विकास होईल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 23, 2018 01:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading