...तर आम्ही शस्त्र हाती घेऊ - उद्धव ठाकरे

...तर आम्ही शस्त्र हाती घेऊ - उद्धव ठाकरे

गृहराज्यमंत्र्यांनी आपले अधिकार वापरले तर त्यांच्या अधिकारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे मुख्यमंत्री असतील तर सरकारचं कठीण आहे, असा हल्लाबोल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केलाय.

  • Share this:

अहमदनगर, 25 एप्रिल :  गृहराज्यमंत्र्यांनी आपले अधिकार वापरले तर त्यांच्या अधिकारावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे मुख्यमंत्री असतील तर सरकारचं कठीण आहे, असा हल्लाबोल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केलाय. उद्धव ठाकरे अहमदनगरच्या दौऱ्यावर असून हत्याकांडात मृत्युमुखी पडलेले वसंत ठुबे आणि संजय केतकर यांच्या कुटुंबीयांची त्यांनी भेट घेतली. उज्ज्वल निकम यांची वकील म्हणून नियुक्ती करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे.  शिवसेनेकडून कुटुंबियांना प्रत्येकी १५ लाख ५० हजाराची आर्थिक मदतही देण्यात आली आहे.

अहमदनरमधील शिवसैनिकांच्या हत्येवर संताप व्यक्त करताना नामर्दाच्या अवलादीला ठेचून काढू असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. गुंडाना पक्षात घ्या आणि सत्ता स्थापन करा असा मूलमंत्र घेऊन सत्ता स्थापन केली असेल तर या देशाला अच्छे दिन येतील असं वाटत नाही असा टोला यावेळी त्यांनी भाजपला मारला.तसंच महाराष्ट्राला वेगळा गृहमंत्री पाहिजे अशी मागणीही केली आहे.

शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे की कुणी आमच्यावर हात उचलला तर त्याला ठेचून काढा. गुंड असे मोकाट राहिले तर उद्या तुमच्या घरातही घुसतील. सगळ्यांनी मिळून गुंडगिरी मोडून काढायला हवी, असं त्यांनी सांगितलं.

First published: April 25, 2018, 1:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading