गेली दोन दिवस तोंड बंद आहे, काय बोलायचं तेच सुचत नाही - उद्धव ठाकरे

गेली दोन दिवस तोंड बंद आहे, काय बोलायचं तेच सुचत नाही - उद्धव ठाकरे

'युतीची खिल्ली उडवणाऱ्यांनी उडवावी. आम्ही मैदानात आल्यावर प्रत्येकाला बघून घेणार.'

  • Share this:

मुंबई 20 फेब्रुवारी :  चार वर्षाच्या भांडणानंतर अखेर भाजप-शिवसेनेत युती झाली. त्यानंतर शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे बुधवारी पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमात सहभागी झालेत. निमित्त होतं दैनिक लोकमतच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमाचं. उद्धव ठाकरेंना 'लोकमत पॉवर आयकॉन महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' या पुरस्काराने गौरवण्यात आलंय. मुंबईत बुधवारी झालेल्या एका शानदार कार्यक्रमात ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते हा पुरस्कार उद्धव ठाकरेंना देण्यात आला.

यावेळी बोलताना उद्धव म्हणाले, ''गेली दोन दिवस तोंड बंद आहे. त्यामुळे काय बोलायचं तेच कळत नाही. म्हणूनच मी मुख्यमंत्र्यांना विचारतो हाऊज् द जोश?'' त्यानंतर मुख्यमंत्र्यांसह सगळ्यांनीच त्यांना टाळ्यांनी दाद दिली. उद्धव ठकारे पुढे म्हणाले,  युतीची खिल्ली उडवणाऱ्यांनी उडवावी. आम्ही मैदानात आल्यावर प्रत्येकाला बघून घेणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

आम्ही कशालाही घाबरत नाही. अंगावर आलं तर शिंगावर घेणारे आम्ही आहोत. सध्याची वेळ ही राजकारणावर बोलायची नाही. पुलवामा घटनेनंतर देशभर आक्रोश आहे. सरकारने कडक पाऊल उचलाव आणि पाकिस्तानला एकदाचा धडा शिकवावा, सगळा देश त्याची वाट पाहतोय असंही ते म्हणाले. आज मला लोकमतने जो पुरस्कार दिलांय तो मी शिवसैनिकांच्या चरणी अर्पण करतो असंही उद्धव यांनी सांगितलं.

यावेळी दैनिक लोकमत वृत्तपत्र समुहातर्फे महाराष्ट्रातल्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना पुरस्काराने गौरविण्यात आलं.

VIDEO : उद्धव ठाकरेंबद्दल काय वाटतं? दीपिका म्हणते...

First published: February 20, 2019, 8:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading