धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर उद्धव ठकरेंचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर उद्धव ठकरेंचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

उद्धव ठाकरे हे धनगर समाजाचं शिष्टमंडळ घेऊन वर्षा वर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले.

  • Share this:

विवेक कुलकर्णी मुंबई 21 फेब्रुवारी : आचारसंहिता लागण्यापूर्वी धनगर समाजाच्या आरक्षणबाबत केंद्राला शिफारस करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलं आहे. आज उद्धव ठाकरे हे धनगर समाजाचं शिष्टमंडळ घेऊन वर्षा वर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले.  यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा एकदा केंद्राला आरक्षणाबाबत लवकरात लवकर शिफारस करू असं आश्वासन देत शिष्टमंडळची बोळवण केली.

शिष्टमंडळमधल्या धनगर समाजाच्या नेत्यांनी पुन्हा एकदा आश्वासन मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.  दरम्यान या धनगर समाजाच्या शिष्टमंडळ भेटीच निमित्त साधत मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये युतीबाबत, नुकत्याच मुख्यमंत्री पदावरून झालेल्या वादाबाबत काय गुफ्तगू झाल असाव अशीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

धनगर समाजाच्या शिष्टमंडळाने आधी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली त्यानंतर ठाकरे यांनी शिष्टमंडळासोबत वर्षावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिलं.

धनगर आरक्षणाचा तिढा

काही दिवसांपूर्वी धनगर आरक्षणाबाबत विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं होतं. 'धनगर आरक्षणाचा अहवाल तयार झालेला आहे. ज्या शिफारशी आम्हाला करायच्या आहे त्या पध्दतीचा हा अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यात काही बाबींची पूर्तता करायची आहे. त्याची पूर्तता करून आम्ही धनगर आरक्षणाची शिफारस करू,' असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं.

आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिलं जाईल. यासाठी आम्हाला थोडा वेळ द्यावा, अशी मी विनंती करतो,' असं म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी धनगर आरक्षणाबाबतच्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं.

Special Report: जैशचे आत्मघातकी हल्लेखोर भारतात घुसले?

First Published: Feb 21, 2019 09:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading