शिवसेना खासदाराचं बंड होणार थंड, रवींद्र गायकवाड मातोश्रीवर

शिवसेना खासदाराचं बंड होणार थंड, रवींद्र गायकवाड मातोश्रीवर

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचं तिकीट कापल्यानंतर गायकवाड आणि त्यांचे समर्थक नाराज कमालीचे नाराज आहेत.

  • Share this:

मुंबई 25 मार्च : निवडणुका आल्या की बंडखोरी आलीच. तिकीट नाकारल्याने उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्या समर्थकांनी मुंबईत धडक दिली होती. त्यानंतर काही गाड्या भरून त्यांचे कार्यकर्ते मुंबईत आले होते. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर बंडखोरी नको म्हणून मातोश्रीवरून त्यांची दखल घेण्यात आली आणि गायकवाड आणि सहकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावलं.

त्यानंतर रवींद्र गायकवाड मातोश्रीवर दाखल झाले. तर शनिवारपासून गायकवाड समर्थक कार्यकर्ते मुंबईतच ठाण मांडून बसले होते. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचं तिकीट कापल्यानंतर गायकवाड आणि त्यांचे समर्थक नाराज कमालीचे नाराज आहेत.

समर्थक मुंबईत

खासदार गायकवाड यांचे समर्थक मुंबईत दाखल झाले होते. पण आंदोलनापूर्वीच रवींद्र गायकवाड समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेरही पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता.

आत्मदहनाचा प्रयत्न

उमरगा शहरात आयोजित करण्यात आलेल्या शिवसैनिकांच्या बैठकीमध्ये रवींद्र गायकवाड यांना तिकीट देण्याची मागणी करण्यात आली होती. पक्षानं तिकीट दिलेल्या ओमराजे निंबाळकर यांचा प्रचार करणार नाही, असा इशाराही शिवसैनिकांनी दिला होता. सगळ्यात धक्कादायक म्हणजे एका शिवसैनिकाने भर सभेमध्ये या समर्थकाने अंगावर रॉकेल ओतत स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.

First published: March 25, 2019, 3:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading