नितीश कुमारांना जमलं, महाराष्ट्रात शिवसेनेपुढे भाजप वाकणार का?

शिवसेनेने युती करावी असं भाजपला वाटतं आहे तर शिवसेनेने अजुन आपले पत्ते खुले केले नाही.

News18 Lokmat | Updated On: Dec 24, 2018 06:13 PM IST

नितीश कुमारांना जमलं, महाराष्ट्रात शिवसेनेपुढे भाजप वाकणार का?

मुंबई  25 डिसेंबर : पंढरपूरच्या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बिहारमधल्या घटनेचा उल्लेख करत भाजपवरचा दबाव वाढवला आहे. बिहारमध्ये भाजपला नमतं घेण्यास भाग पाडल्याबद्दल उद्धव ठाकरेंनी नितीश कुमार आणि रामविलास पासवान यांचं अभिनंदनही केलं आणि भाजपला सवालही केला की राम मंदिराच्या प्रश्नावर भाजपने नितीश कुमार आणि रामविलास पासवान यांची भूमिका स्पष्ट करावी. महाराष्ट्रात सध्या युतीची चर्चा सुरू असून बिहारप्रमाणेच भाजपला नमतं घेण्यास भाग पाडू अशी शिवसेनाला आशा निर्माण झाली आहे.


रामविलास पासवान नाराज झाल्यानं भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी तातडीनं पाटण्यात जाऊन नितीशकुमार आणि पासवान यांच्याशी चर्चा केली आणि भाजप आणि जेडीयू लोकसभेच्या प्रत्येकी 17 जागा लढवतील असं जाहीर केलं. 2014 मध्ये भाजपने बिहारमध्ये लोकसभेच्या 22 जागा जिंकल्या होत्या.


त्यामुळं थोडं नमतं घेत यावेळी 17 जागाच घेण्याचं भाजपने मान्य केलंय. त्याचबरोबर मिळालेल्या 17 जागांमधून भाजप रामविलास पासवान यांना 6 जागा देणार आहे. 2014 सारखी परिस्थिती नाही याची भाजपला जाणीव झाली आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर भाजपला ही जाणीव झालीय. त्यामुळं महाराष्ट्रात शिवसेनेचा आत्मविश्वास वाढला आहे तर भाजपवरचा दबाव वाढला आहे.

Loading...


विधानसभा निवडणुकीत फक्त काही जागांवरून भाजप आणि शिवसेनेची ऐतिहासिक 25 वर्षांची युती तुटली होती. भाजपचा जनाधार वाढल्यानं जुनाच फॉर्म्युला चालणार नाही असं भाजपने शिवसेनेला सांगितलं. तर महाराष्ट्रात मोठा भाऊ आम्हीच असं शिवसेनेचं म्हणणं होतं.


पण आता चंद्रभागा आणि गोदावरीतून बरच पाणी वाहून गेल्याने परिस्थिती वेगळी आहे. शिवसेनेने युती करावी असं भाजपला वाटतं आहे तर शिवसेनेने अजुन आपले पत्ते खुले केले नाही. भाजपवर टीकेचे प्रहार करत दबाव कायम ठेवायचा अशी शिवसेनेची रणणीती आहे. पंढरपूरच्या भाषणातही उद्धव ठाकरे यांनी तोच रोख कायम ठेवला.

त्यामुळे निवडणुकीच्या घोषणेपर्यंत भाजप आणि शिवसेनेत असंच शितयुद्ध चालण्याची शक्यता राजकीय निरिक्षक व्यक्त करत आहेत.
 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 24, 2018 06:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...