'या' कारणामुळे उद्धव ठाकरेंचा अयोध्या दौरा रद्द होण्याची शक्यता

अयोध्या दौऱ्याची पुढील तारीख निश्चित नाही, सूत्रांची माहिती. राज्यात सत्ता स्थापनेच्या तिढा सोडवण्यासाठी वेगानं हालचाली.

  • Share this:

उदय जाधव (प्रतिनिधी) मुंबई, 18 नोव्हेंबर: अयोध्या श्री राम मंदिर निर्माण प्रकरणाचा निकाल सर्वोच्य न्यायालयाने दिल्यानंतर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 24 नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा अयोध्येत श्री राम जन्मभूमीत जाणार असल्याची घोषणा केली होती. मात्र निकालानंतर अजूनही अयोध्येतील श्री राम जन्मभूमी परिसरातील सुरक्षा व्यवस्था अतिसंवेदनशील असल्यामुळे राजकीय पक्षांना अयोध्येत येण्यास सुरक्षा यंत्रणांनी परवानगी दिली नाही. तसंच सत्ता स्थापनेचा तिढा अद्यापही कायम आहे. सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यात वेळ लागत आहे. त्यामुळे 24 नोव्हेंबर रोजी होणारा शिवसेनेचा अयोध्या दौरा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

24 नोव्हेंबर 2018 रोजी उद्धव ठाकरेंनी अयोध्या दौरा केला होता. त्यावेळी पहिले राम मंदिर फीर सरकारचा नारा त्यांनी दिला मात्र प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं प्रतीक्षा करावी लागली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयानं हे प्रकरण निकाली काढलं आणि राम मंदिरासाठी एक स्थमिती स्थापन करून मंदिराचं काम सुरू करावं असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं सरकारला दिले आहे. त्यामुळे निकाल राम मंदिराच्या बाजूनं लागल्यानंतर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार होते.

शरद पवार घेणार सोनिया गांधींची भेट, यासोबत आजच्या 10 ठळक घडामोडी

राज्यात भाजपने सत्ता स्थापनेस नकार दिल्यानंतर राज्यपालांनी दिलेलेल्या वेळेत शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची पत्र देता आली नव्हती. त्यामुळे राजभवनातून सर्व नेत्यांना रिकाम्या हातांनी परत यावं लागलं होतं.

तेव्हापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नुसत्या चर्चाच सुरू असून त्यातून काहीही ठोस निघत नसल्याचं स्पष्ट होतेय. संसदेचं हिवाळी अधिवेशन सोमवार 18 नोव्हेंबरपासून सुरू होतेय. त्या दरम्यान आज शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट होणार आहे. त्या भेटीत निर्णय होण्याची शक्यताही व्यक्त केली जातेय.

First Published: Nov 18, 2019 08:54 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading