मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

राज्यपालांच्या विधानानंतर उद्धव ठाकरे आक्रमक, महाराष्ट्र बंदचा इशारा

राज्यपालांच्या विधानानंतर उद्धव ठाकरे आक्रमक, महाराष्ट्र बंदचा इशारा

उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वदाग्रस्त वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Ajay Deshpande

मुंबई :  माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वदाग्रस्त वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला आहे. तसेच त्यांनी यावेळी शिंदे फडणवीस सरकारवर देखील जोरदार निशाणा साधला. कुणीही येत आणि टपली मारून जातं अशी सध्या महाराष्ट्राची अवस्था झाली आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळ चालू आहे. मिंधे, खोके सरकारमुळे राज्याची अवहेलना सुरू आहे. सरकारमध्ये मुख्यमंत्री आहेत का? अशा शद्बात उद्धव ठाकरे यांनी शिंदे, फडणवीस सरकारव निशाणा साधला आहे.  तसेच राज्यपालांना न हटवल्यास महाराष्ट्र बंदचे संकेत देखील उद्धव ठाकरेंकडून देण्यात आले आहेत.

राज्यपालांच्या वक्तव्याचा समाचार

यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा देखील समाचार घेतला आहे. कुणीही येऊन टपली मारून जातय. हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. ज्यांचं केंद्रात सरकार असतं त्यांची माणस राज्यपाल म्हणून नियुक्त केली जातात.  राज्यपालांना मी राज्यपाल म्हणंन सोडलं आहे. राज्यपालांना हटवण्यासाठी एकत्र आलं पाहिजे. महाराष्ट्र द्रोह्यांना इंगा दाखवा असं आवाहनही यावेळी उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

महाराष्ट्र बंदचा इशारा  

राज्यापाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. राज्यापालांच्या या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. राज्यपालांकडून महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळ चालू आहे. ज्यांना वृद्धाश्रमातही जागा नाही त्यांना राज्यपाल नेमलं आहे.  महाराष्ट्र द्रोह्यांना इंगा दाखवण्यासाठी एकत्र या, केंद्रानं पाठवलेलं सॅम्पलं वृद्धाश्रमात पाठवा. राज्यपालांना  हटवलं नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांच्याकडून यावेळी महाराष्ट्र  बंदचा इशाराही देण्यात आला आहे.

First published:

Tags: BJP, Uddhav Thackeray