उद्धव ठाकरेंच्या नाणारमधल्या सभेवर प्रकल्पग्रस्तांचा बहिष्कार

उद्धव ठाकरेंच्या नाणारमधल्या  सभेवर प्रकल्पग्रस्तांचा बहिष्कार

नाणार रिफायनरीबाबत उद्या होणाऱ्या उध्दव ठाकरे यांच्या सभेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय रिफायनरीविरोधी संघटनेने घेतला आहे.

  • Share this:

22 एप्रिल : नाणार रिफायनरीबाबत उद्या होणाऱ्या उध्दव ठाकरे यांच्या सभेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय रिफायनरीविरोधी संघटनेने घेतला आहे. या संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम यानी प्रकल्पग्रस्तांच्या बैठका घेऊन हा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे आता शिवसेनेची काय भूमिका असणार आहे, याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.

आधी प्रकल्प भूसंपादनाची अधिसूचना रद्द करा आणि मगच गावात सभा घ्या असा पवित्रा या प्रकल्पग्रस्तानी घेतला आहे. नाणार संबंधी अधिसूचना करणाताना नागरिकांना विश्वासात घेतलं नाही, त्यांच्या मतांचा विचार केला नाही त्यामुळे शिवसेनेने जरी नाणार विरोधात आंदोलन केली असली तरी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे.

त्यामुळे आता शिवसेनेच्याच मतदार संघात सभा यशस्वी करण्याचा आव्हान शिवसेनेसमोर आहे. पण दरम्यान या सगळ्यामुळे शिवसेनेची चांगलीच कोंडी झाली आहे.

सेना नेत्यांनी कोणत्याही परिस्थितीत ही सभा यशस्वी झाली पाहिजे असे आदेश स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.

 

First published: April 22, 2018, 11:27 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading