मुंबई, 24 मार्च : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची 26 मार्चला मालेगावमध्ये भव्य अशी सभा होणार आहे. या सभेचा टीझर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या व्हिडीओमधून पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. तसेच भविष्यात अद्वय हिरे यांच्याकडे ठाकरे गट एखादी मोठी जबाबदारी सोपवण्याची शक्यता आहे. तसे संकेत देखील या टीझरमधून मिळत आहेत.
काय आहे टीझरमध्ये?
उद्धव ठाकरे यांची 26 मार्चला मालेगावमध्ये सभा होणार आहे. या सभेचा टीझर प्रसिद्ध करण्यात आला आहे. या व्हिडओमध्ये उद्धव ठाकरेंच्या भाषणाच्या काही ओळी आहेत. 'बरं झाले गद्दार गेले आणि हिरे सापडले, अद्वय केवळ मालेगाव नाही तर पुरा उत्तर महाराष्ट्र तुम्हाला बघायचा आहे. म्हटलं होत मालेगावला सभा घेतो जे काय बोलायचं ते मोकळ्या मैदानात बोलायचं काय असेल ते मैदानात'. असं म्हणत या टीझरमधून पुन्हा एकदा शिंदे गटाला डिवचण्यात आलं आहे.
राज ठाकरेंच्या सभेनंतर भाजपकडून उद्धव ठाकरेंना टाळी? राज्याच्या राजकारणातली मोठी अपडेट
संजय राऊतांचा मालेगाव दौरा
उद्धव ठाकरे यांची 26 मार्चला मालेगावमध्ये सभा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मालेगावमध्ये जाऊन पहाणी केली होती. यावेळी त्यांनी शिंदे गटाचे नेते दादा भुसे यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. त्यानंतर राऊत आणि भुसे यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपचं राजकारण रंगल्याचं पहायला मिळालं. आता 26 मार्चला उद्धव ठाकरे यांची मालेगावमध्ये सभा होणार आहे. या सभेत ते काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eknath Shinde, Malegaon, Shiv sena, Uddhav Thackeray