सिनेमावाले येऊन धनगरांना काय मिळणार? संजूबाबाच्या प्रवेशावरून उद्धव ठाकरेंचा जानकरांना टोला

सिनेमावाले येऊन धनगरांना काय मिळणार? संजूबाबाच्या प्रवेशावरून उद्धव ठाकरेंचा जानकरांना टोला

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त 25 ऑगस्टला राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश करणार होते, असा दावा रासपाचे प्रमुख आणि मंत्री महादेव जानकर यांनी केला. यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महादेव जानकर यांना सामना संपादकीयमधून टोला हाणला आहे.

  • Share this:

मुंबई, 27 ऑगस्ट : बॉलिवूड अभिनेता संजय दत्त 10 वर्षांनंतर पुन्हा एकदा सक्रीय राजकारणात प्रवेश करणार असल्याचं म्हटलं जात आहे. संजय दत्त 25 ऑगस्टला राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश करणार होते, असा दावा रासपाचे प्रमुख आणि मंत्री महादेव जानकर यांनी केला. यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महादेव जानकर यांना सामना संपादकीयमधून टोला हाणला आहे. 'सिनेमावाले येऊन धनगरांना काय मिळणार? संजय दत्त हे जानकरांच्या पक्षात प्रवेश करणार असतील तर शाहरुख खान, अक्षय कुमार हे रामदास आठवले यांच्या पक्षात प्रवेश करतील आणि सलमान खान वगैरे मंडळी आंबेडकर-ओवेसींच्या वंचित आघाडीत प्रवेश करण्यासाठी अर्ज देतील. सगळाच विनोद आहे', अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी जानकरांना खोचक टोला हाणला आहे.

काय आहे आजचे सामना संपादकीय?

- राष्ट्रीय समाज पार्टीचे अध्यक्ष नामदार महादेव जानकर यांनी आता सांगितले आहे की, अभिनेता संजय दत्त हे पुढील महिन्यात ‘रासपा’त प्रवेश करणार आहेत. इतकेच नव्हे तर दत्त महाशय हे जानकर पक्षाचा जोरदार प्रचारही करणार आहेत.

- ‘संजय दत्त प्रवेश करणार’ या जानकरी दाव्याने मात्र करमणूक झाली आहे. मेळावा धनगर समाजाचा होता व धनगरांच्या अनेक रखडलेल्या प्रश्नांना वाचा फुटेल असे वाटले होते, पण मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनी मेळाव्याकडे पाठ फिरवली.

- महाराष्ट्रातील धनगर समाजातील अस्वस्थता यानिमित्ताने दिसून आली. सरकारने धनगर बांधवांसाठी अनेक योजना जाहीर गेल्या, त्या आजही कागदावरच आहेत. धनगर समाजाला मेंढी-पालनासाठी जागा आणि जागा खरेदीसाठी 70 कोटी अनुदानाची घोषणा केली. नवी मुंबई, पुणे, संभाजीनगर, नाशिक, नागपूर, अमरावती येथे धनगर विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे बांधण्याची योजना जाहीर केली व त्यासाठी दीडशे कोटी रुपयांची तरतूद केली. त्यातील किती वसतिगृहांचे कार्य सुरू झाले?

(वाचा : लोकांच्या मनातली मी CM म्हणणाऱ्या पंकजा मुंडेंनी केलं फडणवीसांचं तोंड भरून कौतुक)

- धनगर समाजास घरे, नोकऱया, प्रशिक्षण, चराई अनुदान वगैरेच्या योजना जाहीर झाल्या. या योजनांना गती देण्यासाठी महादेव जानकरांनी सरकारात जोर लावायलाच हवा. जानकर असेही म्हणाले की, त्यांचा पक्ष ‘कमळ’ चिन्हावर लढणार नाही. ते सगळे ठीक असले तरी गेली पाच वर्षे त्यांच्या पक्षाचा ‘भुंगा’ हा कमळ फुलाभोवती पिंगा घालत आहे.

- फूल, मग ते कुठलेही असो आणि भुंगा यांचे एकमेकांशिवाय पान हलत नाही. मात्र तरीही जानकर बोलले. आता हादेखील एक ‘सौम्य विनोद’ आहे असे कोणी समजू नये. मुळात धनगर समाजाची आरक्षणाची पूर्ण न झालेली मागणी हा खरे म्हणजे त्या समाजासाठी सगळ्यात ज्वलंत विषय आहे. हे आरक्षण देण्याचे आश्वासनदेखील हवेतच विरले आहे.

(वाचा : पुण्यात लष्करी वेशात फिरतोय माथेफिरू, घरात घुसून मुलींवर करतोय विनयभंग)

- आता संजय दत्त यांनी पक्षप्रवेश केल्याने धनगर समाजाचे सर्व प्रश्न सुटणार असतील तर त्यांच्या हाती काठी आणि घोंगडे द्यायलाच हवे. मुळात मुख्य प्रश्न असा आहे की, धनगर समाजाच्या तरुणांवरील गुन्हे कधी मागे घेणार?

- 2014 साली बारामतीत झालेल्या आंदोलनापासून अलीकडे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी नगर जिल्ह्यातील ‘चौंढी’ येथे धनगर तरुणांनी आंदोलन केले. या आंदोलनात भाग घेतलेल्या असंख्य तरुणांवर गुन्हे आणि खटले दाखल झाले. यात अनेकांना नोकऱया गमवाव्या लागल्या. या तरुणांवरील गुन्हे मागे घेण्याचा शब्द सरकारने दिला होता, पण शब्द देऊनही धनगर समाजातील तरुणांवरील गुन्हे मागे घेतले नाहीत. त्यावर जानकरांचे काय उत्तर आहे?

(वाचा : ED चा दणका, या 90 वर्षांच्या काँग्रेस नेत्याविरुद्ध तक्रार दाखल)

- धनगर समाजातील किती आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले व मागे घेतले नसतील तर त्यामागचे झारीतील शुक्राचार्य कोण हे समजणे गरजेचे आहे.

- सिनेमावाले येऊन धनगरांना काय मिळणार? संजय दत्त हे जानकरांच्या पक्षात प्रवेश करणार असतील तर शाहरुख खान, अक्षय कुमार हे रामदास आठवले यांच्या पक्षात प्रवेश करतील आणि सलमान खान वगैरे मंडळी आंबेडकर-ओवेसींच्या वंचित आघाडीत प्रवेश करण्यासाठी अर्ज देतील. सगळाच विनोद आहे. विनोदाची टवाळी होऊ नये इतकेच.

धनंजय मुंडेंच्या ओपन चॅलेंजवर मुख्यमंत्र्यांचा पलटवार, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 27, 2019 06:40 AM IST

ताज्या बातम्या