...शिस्तीचे वळण राजांना लागतंय, अभिनंदन! उद्धव ठाकरेंच्या टपल्या आणि टिचक्या

...शिस्तीचे वळण राजांना लागतंय, अभिनंदन! उद्धव ठाकरेंच्या टपल्या आणि टिचक्या

अमित शहा किंवा पंतप्रधान मोदी व्यासपीठावर असताना शिटय़ा मारणे, कॉलर उडवणे, इतर नाटय़छटा करणे हे असले प्रकार भाजपच्या शिस्तीत बसत नाहीत (शरद पवारांनी हे खपवून घेतले हा त्यांचा बेशिस्तपणा) याची कल्पना देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांनी सातारच्या राजांना एव्हाना दिली असेल. - उद्धव ठाकरे

  • Share this:

मुंबई, 16 सप्टेंबर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत उदयनराजे भोसले यांनी नवी दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंदक्रांत पाटील देखील उपस्थित होते. 'देवेंद्र फडणवीस यांच्या काळात 15 वर्षांपासूनची प्रलंबित कामे मार्गी लागली. राष्ट्रवादी पक्षात अडवा व जिरवा धोरण राबवलं गेलं. मोठ्या प्रमाणात होणाऱ्या पक्षांतरामागे हेच कारण आहे',अशी प्रतिक्रिया उदयनराज यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर दिली. उदयनराजेंच्या पक्षप्रवेशावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 'अमित शहा किंवा पंतप्रधान मोदी व्यासपीठावर असताना शिटय़ा मारणे, कॉलर उडवणे, इतर नाटय़छटा करणे हे असले प्रकार भाजपच्या शिस्तीत बसत नाहीत (शरद पवारांनी हे खपवून घेतले हा त्यांचा बेशिस्तपणा) याची कल्पना देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांनी सातारच्या राजांना एव्हाना दिली असेल. उदयनराजेंनी दिल्लीत जाऊन हायकमांडच्या आशीर्वादाने भाजपचा रस्ता पकडला व भाजपात प्रवेश घेताना त्यांनी कॉलरही

उडवली नाही. शिस्तीचे वळण राजांना लागत आहे, अभिनंदन!', अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली आहे.

काय आहे आजचे सामना संपादकीय?

-  भाजपने भागाभागातील सरदार, संस्थानिकांच्या वंशकुळातील लोक आधीच घेतले व आता थेट सातारच्या राजांनाच प्रवेश देऊन ‘स्व-राज्य’ आणण्याच्या दिशेने पाऊल टाकले.

- लोकसभा निवडणुकीपूर्वी उदयनराजे यांची भाजपविषयी भूमिका वेगळी होती व ती टोकाची होती. ‘‘कोण मोदी? आमच्या साताऱयात मोदी पेढेवाले आहेत’’ असे त्यांनी मोदींचा एकेरी उल्लेख करीत बजावले होते.

- मोदींच्या सरकारने लोकांच्या हाती भिकेचे वाडगे दिले असा संताप त्यांनी कॉलर उडवत व्यक्त केला होता. आता त्यांनी मन बदलले आहे व मोदी-शहा हे शिवरायांच्या विचाराने कार्य करीत असल्याचे विचार मांडले आहेत.

(वाचा : महाराज स्वतःच्या स्वार्थासाठी दिल्लीश्वरांचे अधीन झाले नव्हते; पवारांचा उदयनराजेंना टोला)

- उदयनराजे यांचे ‘ईव्हीएम’विषयीदेखील वेगळे मत होते.

- उदयनराजे यांना जाळय़ात ओढल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाची मते पदरात पडतील असे भाजपचे गणित आहे, पण शिवराय हे फक्त एकाच जातीचे नव्हेत, तर सर्वच जाती-धर्मांच्या लोकांचे दैवत आहे. त्यामुळे शिवरायांचे तेरावे वंशज एका जातीच्या राजकारणाचे ‘मोहरे’ म्हणून राजकारणात वापरले जात असतील तर तो शिवरायांच्या विचारांचा अपमान ठरेल.

(वाचा : सांगलीत राजकीय भूकंप; काँग्रेसच्या या ज्येष्ठ नेत्याचा मुलगाही जाणार भाजपमध्ये!)

- भाजप हा शिस्तीचा पक्ष आहे. शिस्त, तत्त्व, संस्कार, नीतिमत्ता व साधनशुचिता या पंचसूत्रीवर भाजपचा डोलारा उभा आहे. अमित शहा किंवा पंतप्रधान मोदी व्यासपीठावर असताना शिटय़ा मारणे, कॉलर उडवणे, इतर नाटय़छटा करणे हे असले प्रकार भाजपच्या शिस्तीत बसत नाहीत (शरद पवारांनी हे खपवून घेतले हा त्यांचा बेशिस्तपणा) याची कल्पना देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांनी सातारच्या राजांना एव्हाना दिली असेल.

(वाचा :उदयनराजे म्हणाले, राष्ट्रवादीची माझा बँड वाजवण्याची तयारी पण...)

- येथे हायकमांड आहे व ते दिल्लीत आहे. थोरल्या छत्रपतींनी दिल्लीतील तेव्हाच्या हायकमांडला जुमानले नव्हते. उदयनराजेंनी दिल्लीत जाऊन हायकमांडच्या आशीर्वादाने भाजपचा रस्ता पकडला व भाजपात प्रवेश घेताना त्यांनी कॉलरही उडवली नाही. शिस्तीचे वळण राजांना लागत आहे, अभिनंदन!

VIDEO: भाजपच्या मंचावर उदयनराजेंनी पहिल्यांदा उडवली कॉलर आणि म्हणाले...!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 16, 2019 07:06 AM IST

ताज्या बातम्या