उद्धव ठाकरेंची केंद्राकडे पहिली मोठी मागणी; म्हणाले यामुळे होतंय राज्याचं नुकसान

उद्धव ठाकरेंची केंद्राकडे पहिली मोठी मागणी; म्हणाले यामुळे होतंय राज्याचं नुकसान

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे राज्यासाठी पहिली मोठी मागणी ठेवली आहे. मुख्यमंत्र्यांनी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहिलं आहे.

  • Share this:

मुंबई, 11 डिसेंबर : महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे राज्यासाठी पहिली मोठी मागणी ठेवली आहे. मुख्यमंत्र्यांनी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून राज्याचे थकित 15558.05 कोटी रुपये परत करण्याची मागणी केली आहे.

केंद्र सरकारकडून राज्याला साडेपंधरा हजार कोटी रुपये येणं आहे. ही रक्कम तातडीने द्यावी, अशा मागणीचं पत्र उद्धव ठाकरे यांनी सीतारामन यांना लिहिलं आहे.

ANI ने दिलेल्या बातमीनुसार केंद्राकडून राज्याला येणारा कराचा वाटा वेळेत येत नाही, त्यामुळे राज्यापुढे अडचणी येतात, असंही मुख्यमंत्र्यांनी निर्मला सीतारामन यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

दरम्यान,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारची आज मंत्रिमंडळ बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत समृद्धी महामार्गासह इतर काही योजनांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.

संबंधित - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 'इन अ‍ॅक्शन', मंत्रिमंडळाने घेतले 5 महत्त्वाचे निर्णय

मागील सरकारच्या काळात समृद्धी महामार्गाचा मुद्दा चांगलाच चर्चेत होता. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट म्हणूनही ओळखला जात होता. याच समृद्धी महामार्गाला अतिरिक्त 3500 कोटी रुपये निधी भागभांडवल म्हणून देण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीचा शपथविधी होऊन आज 14 दिवस झाले तरीही कॅबिनेट मंत्र्यांची अवस्था बिनखात्याचे मंत्री अशी आहे. मंत्रालयात आज दुपारी कॅबिनेट बैठक झाली. मात्र सर्व खाती अजूनही स्वतः उद्धव ठाकरे हाताळत आहेत. याबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये नाराजीचा सूरही उमटू लागला आहे.

--------------------------

अन्य बातम्या

'स्वाभिमानी'ची राज्यस्तरीय कार्यकारिणी बरखास्त, आता कुणाला मिळणार संधी?

मराठी IPS अधिकारी करणार हैदराबाद Encounterची चौकशी

आप जिस स्कूल में पढ़ते हो हम उस स्कूल के हेडमास्टर है, राऊतांनी शहांना सुनावलं

कजा मुंडे यांची नाराजी आताच का आली उफाळून? ही आहेत 3 महत्त्वाची कारणं

बंदीनंतर मुंबईकर खेळाडूचा कमबॅक! 175 चेंडूत केली वादळी द्विशतकी खेळी

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 11, 2019 05:15 PM IST

ताज्या बातम्या