मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'उद्धव ठाकरेंकडे ब्लू टिकही राहणार नाही', भाजपने सांगितलं भविष्य!

'उद्धव ठाकरेंकडे ब्लू टिकही राहणार नाही', भाजपने सांगितलं भविष्य!

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेंच्या पक्षाला द्यायचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. निवडणूक आयोगाचा हा निर्णय उद्धव ठाकरे यांच्यासाठी धक्का आहे.

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेंच्या पक्षाला द्यायचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. निवडणूक आयोगाचा हा निर्णय उद्धव ठाकरे यांच्यासाठी धक्का आहे.

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेंच्या पक्षाला द्यायचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. निवडणूक आयोगाचा हा निर्णय उद्धव ठाकरे यांच्यासाठी धक्का आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Jalgaon, India

जळगाव, 19 फेब्रुवारी : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेंच्या पक्षाला द्यायचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. निवडणूक आयोगाचा हा निर्णय उद्धव ठाकरे यांच्यासाठी धक्का आहे. या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात धाव घेणार आहेत. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर भाजपने उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या ट्विटर अकाऊंटची ब्लू टिक, रेड टिक सगळंच निघणार आहे. उद्धव ठाकरेंबाबत सगळंच बघायला मिळणार आहे, त्यांना पश्चाताप करायलाही वेळ मिळणार नाही, असं भाजप नेते गिरीश महाजन म्हणाले आहेत.

'उद्धव ठाकरेंकडे थोडी धुगधुगी शिल्लक आहे, आताचं चित्र बघून उद्धव ठाकरेंकडे कोणी राहिल, असं मला वाटत नाही, कारण आता उद्धव ठाकरेंची शिवसेना आता उद्धवसेना राहिली आहे. पुढील काळात ठाकरेंकडे किती जण राहतात, हे बघावं लागेल. पुढच्या काही दिवसांमध्ये अजून चित्र बदलेलं पाहायला मिळेल,' असा दावाही गिरीश महाजन यांनी केला आहे.

आमच्यासोबत निवडून येऊन युती तोडून उद्धव ठाकरे यांनी आयुष्यातील खूप मोठी चूक केली आहे, येणारा काळ उद्धव ठाकरेंसाठी अधिक बिकट राहणार असल्याचं भाकीत गिरीश महाजन यांनी व्यक्त केलं आहे.

'उद्धव ठाकरेंकडे काही राहिलेलं नाही, त्यामुळे त्यांचा तोल जायला लागला आहे. मातोश्रीमध्ये असलेली शिवसेना खऱ्या अर्थाने जनताभिमुख झाली आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे आता कुणालाही शिव्या घालतील आणि न्यायायलयाच्या निर्णयानंतर पुढे काय बोलतील, याचा विचारही करू शकणार नाही. उद्धव ठाकरे यांच्याकडून अशी वक्तव्य अपेक्षित आहेत.' अशी टीका गिरीश महाजन यांनी केली.

'तुम्हाला धनुष्यबाण मिळाला नाही, म्हणून निवडणुका घ्यायच्या का? आमच्याबरोबर युती करून 55 आमदार आणि 18 खासदार निवडून आले, त्यावेळी तुम्ही आम्हाला सोडून गेले. त्यावेळी उद्धव ठाकरेंना निवडणुका घेऊन स्वबळावर आम्ही निवडून येतो हे का सुचलं नाही?' असा सवालही गिरीश महाजन यांनी विचारला.

'उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली. काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसावं, राष्ट्रवादीच्या विचारांनी पक्ष चालवावा हे बाळासाहेबांचे विचार होते का? तुमचे वडील होते म्हणून बाळासाहेब तुमचे नाहीत. बाळासाहेब एक वेगळा विचार आहे, या विचारांनी प्रेरित होऊन अनेक कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंना सोडून खरी शिवसेना निर्माण केली आहे,' असं गिरीश महाजन म्हणाले.

First published:
top videos

    Tags: BJP, Girish mahajan, Shivsena, Uddhav Thackeray