मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येत दाखल, थोड्याच वेळात पत्रकार परिषद

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येत दाखल, थोड्याच वेळात पत्रकार परिषद

शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अयोध्येत राम जन्मभूमीत रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत.

  • Share this:

मुंबई, 07 मार्च :  शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अयोध्येत राम जन्मभूमीत रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांचा हा तिसरा अयोध्या दौरा आहे.

या आधी जेव्हा उद्धव ठाकरे अयोध्येत, श्री राम जन्मभूमीच्या दर्शानाला आले होते. तेव्हा त्यांच्या दौर्याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली होती. आज होणाऱ्या शिवसेनेच्या दौऱ्यावर मात्र, कोरोना व्हायरसचं सावट स्पष्टपणे दिसून येतंय. कारण, शिवसेनेची नियोजित शरयु नदी महाआरती रद्द करण्यात आली आहे.

कारण, कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकार आणि आरोग्य विभागांनी लोकांची गर्दी होणाऱ्या ठिकाणांवर बंदी घातली आहे. त्यामुळे शरयू महाआरतीसाठी हजारोंच्या संख्येनं होणारी गर्दी आणि कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून शिवसेनेची शरयू महाआरतीला परवानगी देण्यात आलेली नाही.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येत दाखल झाल्यावर त्यांची पत्रकार परीषद होणार आहे. त्यानंतर ते  राम जन्मभूमीत रामलल्लाचे दर्शन घेणार आहे. यावेळी त्यांच्या सोबत रश्मी ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे देखिल उपस्थित असणार आहेत.

शिवसेनेच्या या अयोध्या दौऱ्यासाठी पक्षाचे नेते, मंत्री, खासदार, आमदार  देखील उपस्थित राहणार आहेत. मुंबई आणि ठाण्याहून हजारोंच्चा संख्येने शिवसैनिक अयोध्येत दाखल झालेत. राज्यात महाविकास आघाडीच्या सरकारमुळे शिवसेनेनं त्यांचं आक्रमक हिंदु्त्त्व मवाळ केल्याचेही आरोप विरोधकांडून केले जात होते. या सर्व आरोपांना शिवसेना आज कृतीतून उत्तर देणार असल्याचं सांगितलं जातंय.

संजय राऊतांनी दिलं काँग्रेस नेत्यांना निमंत्रण

दरम्यान, सेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधला. संजय राऊत यांनी सांगितलं की, फैजाबाद एअर स्ट्रीपमध्ये लँडिंगसाठी अडचण असल्याने लखनौ एअरपोर्टवर उद्धव ठाकरे यांचं विमान लँडिंग करणार आहे.

उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर शरयू नदीवर महाआरती करणार नाहीत. दरम्यान, शरयू नदीवर महाआरतीचं नियोजन करण्यात आलं होतं. परंतु, जास्त गर्दी होईल, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि उत्तर प्रदेशच्या राज्य आरोग्य विभागाने विनंती केल्यानंतर महाआरतीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील महाविकास आघाडीच्या सरकारने 100 दिवस पूर्ण केले आहेत. यासाठी उद्धव ठाकरे अयोध्या दौरा करत आहे. ते रामलल्लाचं दर्शन घेणार आहेत. यावेळी सर्व पक्षाच्या नेत्यांनी उपस्थित राहावे, असं आवाहन शिवसेनेतर्फे करण्यात आलं आहे. काँग्रेसच्या नेत्यांनीही यावे, असं सांगत राम राज्याची कल्पना राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सगळ्यात आधी मांडली होती, असं संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं. राम मंदिर हे देशाचे अस्मिता मंदिर आहे. राम मंदिर कोणत्या एखाद्या पक्षाचं नाही, असंही संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं. महाराष्ट्रातून सुमारे 5 हजार शिवसैनिक अयोध्येत येत आहेत. अयोध्येत जास्त गर्दी होऊ नये, यासाठी शिवसैनिकांना न येण्याचेही आवाहन करण्यात आल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं.

First published: March 7, 2020, 1:15 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading