मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

युती सरकारमध्येच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं, माजी मंत्र्याचा गौप्यस्फोट

युती सरकारमध्येच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं, माजी मंत्र्याचा गौप्यस्फोट

Uddhav thackeray 11

Uddhav thackeray 11

त्यासाठी त्यांनी आमदारांचा गट तयार करून लॉबिंग केली होती. मनोहर जोशी यांना पायउतार करून स्वतः मुख्यमंत्री व्हायचं होतं

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bid Rural, India

बीड, 01 ऑक्टोबर : '1996 च्या युती सरकारमध्येच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. यासाठी थेट बाळासाहेब ठाकरे यांच्याकडेच आमदारांचं लॉबिंग करून मागणी केली होती, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे माजी नेते आणि माजी मंत्री सुरेश नवले यांनी केला आहे. त्यांच्या या दावामुळे एकच खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आग्रहाखातर मी मुख्यमंत्री झाल्याचा उद्धव ठाकरे वारंवार दावा करत असतात. पण, त्यांच्या या दाव्याबद्दल माजी मंत्री सुरेश नवले यांना धक्कादायक खुलासा केला आहे.

1995 च्या युती सरकारमध्येच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं, त्यासाठी त्यांनी आमदारांचा गट तयार करून लॉबिंग केली होती. बाळासाहेब ठाकरे यांना भेटावं आणि त्यांच्या कानावर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करावे, अशी मागणी करण्यास सांगितले होते. मनोहर जोशी यांना पायउतार करून स्वतः मुख्यमंत्री व्हायचं होतं, असं खळबळजनक वक्तव्य सुरेश नवले यांनी केलं आहे.

('अजित दादांना कामच काय उरलं? आता इंदुरीकर महाराजांची कीर्तनं..', शहाजीबापूंचा टोला)

'उद्धव ठाकरे यांचा दाखवायचा चेहरा पडद्यावरचा आणि आतला चेहरा वेगळा आहे. राज ठाकरे, नारायण राणे यांनी पडद्याआडच्या चेहराचा अनुभव सगळ्यांनी घेतला आहे,  त्यावेळी विरोध केला म्हणून शिवसेनेच्या मंत्र्यावरच हल्ला देखील करायला लावला होता, त्याचे मुख्य सूत्रधार उद्धव ठाकरे होते असा थेट आरोप देखील त्यांनी केला.

काय म्हणाले, सुरेश नवले?

आमचे मित्र उदय शेट्टी यांना उद्धव ठाकरेंनी माझ्याकडे पाठवलं होतं. बाळासाहेब ठाकरे यांना भेटावं आणि त्यांच्या कानावर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करावे, अशी मागणी करण्यास सांगितले होते. त्यामुळे मी, चंद्रकांत खैरे, अर्जुन खोतकर यांच्यासह आणखी काही आमदार जे आता स्वर्गवासी झाले आहे, त्यांना घेऊन बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे गेलो होतो. आम्ही बाळासाहेबांना सांगितलं, उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करावे. यावर बाळासाहेब म्हणाले की, या सगळ्या आमदारांची इच्छा आहे का? यावर आम्ही सगळ्या जणांनी उत्स्फुर्तपणे होकार दिला. याचे साक्षीदार अर्जुन खोतकर आहे. चंद्रकांत खैरे आहे. खैरे हे उद्धव ठाकरे यांच्या हातात काम करत आहे. त्यामुळे ते आता नाही म्हणतील.

(Gulabrao Patil : थापा आला, आता आणखी एक 'खास माणूस' येतोय, गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याने उद्धव ठाकरेंना धक्का)

1996 लाच उद्धव ठाकरे यांना महाराष्टाचे मुख्यमंत्रिपद मिळावे अशी इच्छा होती. पण, त्यावेळी माझे आणि तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि माझ्यामध्ये वाद झाला. एवढा विश्वासू सहकारी असं काही करेल म्हणून वाईट वाटले. आमचा वाद विकोपाला गेला. त्यामुळे मी 1998 ला शिवसेनेतून बाहेर पडलो. मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आणि स्वतंत्र्यपणे निवडणूक लढवली.

मी मंत्रिमंडळात असताना मला शासकीय बंगला होता. त्यावेळी काही शिवसैनिक मला मारण्यासाठी आले होते. मला धमकी दिली. महाराष्ट्राच्या विधानसभेत हे प्रकरण काढले. त्यानंतर केंद्रीय मंत्र्याने मला झेड सुरक्षा पुरवली. त्यामागे कदाचित उद्धव ठाकरे यांचा हात असावा. बाळासाहेबांच्या पाठीमागे उद्धव ठाकरे हेच सर्व सूत्र हलवत होती. उद्धव ठाकरेंची दोन रुप आहे, राज ठाकरे, नारायण राणे यांनी पडद्याआडच्या चेहराचा अनुभव सगळ्यांनी घेतला आहे, त्यामुळे पडद्यावर जे रूप आहे, ते वेगळं आहे, असा आरोप नवले यांनी केला.

First published: