मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Shivsena : ठाकरे विरुद्ध शिंदे! निवडणूक आयोगातल्या लढाईला उद्यापासून सुरूवात

Shivsena : ठाकरे विरुद्ध शिंदे! निवडणूक आयोगातल्या लढाईला उद्यापासून सुरूवात

शिवसेना कुणाची या ठाकरे आणि शिंदेंमधल्या लढाईला उद्यापासून खऱ्या अर्थाने सुरूवात होणार आहे.

शिवसेना कुणाची या ठाकरे आणि शिंदेंमधल्या लढाईला उद्यापासून खऱ्या अर्थाने सुरूवात होणार आहे.

शिवसेना कुणाची या ठाकरे आणि शिंदेंमधल्या लढाईला उद्यापासून खऱ्या अर्थाने सुरूवात होणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

नवी दिल्ली, 11 डिसेंबर : शिवसेना कुणाची या ठाकरे आणि शिंदेंमधल्या लढाईला उद्यापासून खऱ्या अर्थाने सुरूवात होणार आहे. धनुष्यबाणावर दावा करण्यासाठी कागदपत्रांच्या लढाईनंतर उद्या प्रत्यक्ष युक्तीवाद सुरू होण्याची शक्यता आहे. मागचे दोन महिने दोन्ही बाजूंनी लाखो कागदपत्र निवडणूक आयोगाला सादर करण्यात आली आहेत. चिन्ह आणि शिवसेना नाव गोठवल्यानंतर आता निवडणूक आयोगाचा अंतिम निर्णय कधी येणार? याकडे अनेकांचं लक्ष लागलं आहे.

जून महिन्यामध्ये विधान परिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांसह बंड केलं. शिंदेंच्या या बंडामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि राज्यातलं महाविकासआघाडी सरकार कोसळलं. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री झाले.

शिवसेना ठाकरेंची का शिंदेंची? असा होणार निर्णय, निवडणूक आयोग आयुक्तांनी सांगितली प्रक्रिया

मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर दावा ठोकला. याचकाळात शिवसेनेचे 18 पैकी 13 खासदारही शिंदेंसोबत आले. शिवसेना कुणाची हा निर्णय निवडणूक आयोग घेईल, असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिल्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह गोठवलं. निवडणूक आयोगाकडून उद्धव ठाकरेंच्या गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तर शिंदेंच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिलं. आयोगाकडून ठाकरेंना मशाल आणि शिंदेंना ढाल-तलवार हे चिन्ह देण्यात आलं.

शिवसेनेवर दावा केल्यानंतर शिंदे आणि ठाकरेंकडून मोठ्या प्रमाणावर निवडणूक आयोगाला कागदपत्र सादर करण्यात आली. यानंतर आता उद्यापासून प्रत्यक्ष युक्तीवाद सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. येत्या काही महिन्यांमध्ये मुंबईसह राज्यांमधल्या वेगेवेगळ्या महापालिकांच्या निवडणुका आहेत, त्याआधी निवडणूक आयोग निर्णय घेणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

आधी मिंध्याचे नेते हे बाळासाहेब होते आता...., शिंदेंच्या भाषणाचं उद्धव ठाकरेंकडून पोस्टमॉर्टेम

First published:

Tags: Eknath Shinde, Election commission, Shivsena, Uddhav Thackeray