मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

उद्धव ठाकरेंच्या जवळचा आणखी एक आमदार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला? सह्याद्रीवर राजकीय खलबतं!

उद्धव ठाकरेंच्या जवळचा आणखी एक आमदार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला? सह्याद्रीवर राजकीय खलबतं!

सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीगाठी सुरु असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अतिशय विश्वासू आमदारांपैकी एक असलेल्या एका आमदाराने आज सह्याद्री अतिथीगृहावर हजेरी लावली.

सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीगाठी सुरु असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अतिशय विश्वासू आमदारांपैकी एक असलेल्या एका आमदाराने आज सह्याद्री अतिथीगृहावर हजेरी लावली.

सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्र्यांच्या भेटीगाठी सुरु असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अतिशय विश्वासू आमदारांपैकी एक असलेल्या एका आमदाराने आज सह्याद्री अतिथीगृहावर हजेरी लावली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Chetan Patil

मुंबई, 13 सप्टेंबर : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या रशिया दौऱ्यावर आहेत. रशियात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचित्राचं अनावरण देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. त्याच निमित्ताने फडणवीस रशिया दौऱ्यावर गेले आहेत. पण ते रशिया दौऱ्याला गेले असताना महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्रात दोन महिन्यांपूर्वी सत्तांतर झालं. महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि राज्यात नवं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकार स्थापन झालं. हे सरकार स्थापन करण्यात एकनाथ शिंदे यांच्यासोबतच देवेंद्र फडणवीस यांचीदेखील महत्त्वाची भूमिका होती. पण ते आज रशिया दौऱ्यावर गेले असताना सह्याद्री अतिथीगृह इथे वेगळ्याच राजकीय घडामोडी बघायला मिळत आहेत. काही अनपेक्षित भेटीगाठी घडताना दिसत आहेत. अर्थात त्या भेटीगाठींमध्ये नेमकी काय चर्चा झालीय हे गुलदस्त्यात आहे. पण भेटीगाठी होत आहेत हे खरं आहे. या भेटीगाठी एकीकडे घडत असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अतिशय विश्वासू आमदारांपैकी एक असलेल्या एका आमदाराने आज सह्याद्री अतिथीगृहावर हजेरी लावली. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माजी मंत्री छगन भुजबळ, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. अजित पवार यांनी सह्याद्री अतिथीगृहावर जावून मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस रशिया दौऱ्यावर गेलेले असताना या भेटीगाठी घडल्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या भेटीत राज्यातील विकासकामांसाठी निधी देण्याबाबत चर्चा झाली. तसेच लम्पी आजारावर उपाय म्हणून पशूंसाठी लसीकरण लवकरात लवकर सुरु करावं, अशी मागणी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

(आदित्य ठाकरे-जयंतरावांची टीका, फडणवीस रशियाला, अजित पवार एकनाथ शिंदेच्या भेटीला)

एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सह्याद्री अतिथीगृह येथे जावून भेट घेतली. दुसरीकडे शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू हे देखील आज सह्याद्री अतिथीगृहावर गेले होते. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या सहयाद्री अतिथीगृहावर बैठका सुरू असतांना शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू सह्याद्री अतिथीगृहावर आल्यानंतर सगळ्यांच्या भुवया उंचावल्या.

सुनील प्रभू यांनी आपण सह्याद्री अतिथीगृहावर नेमकं का गेलो त्यामागील स्पष्टीकरण दिलं आहे. "MMRDA आणि MSRDCच्या आयुक्तांना भेटण्यासाठी मी आलो होतो. मात्र MSRDCच्या ब्रिजवर खड्डे आहेत. हे खड्डे बुजवावे ही मागणी मी केली आहे. मुंबई महाराष्ट्राला दुय्यम दर्जा देण्याचे काम हे सरकार करत आहे. महाराष्ट्राचे महत्व कमी केले जात आहे", अशी प्रतिक्रिया सुनील प्रभू यांनी दिली आहे.

First published:

Tags: Eknath khadse, Uddhav tahckeray