मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

उद्धव ठाकरेंची तोफ बंडखोरांच्या बालेकिल्ल्यात धडाडणार! राज्यपालांविरोधात उद्याच 'महाराष्ट्र बंद'ची हाक?

उद्धव ठाकरेंची तोफ बंडखोरांच्या बालेकिल्ल्यात धडाडणार! राज्यपालांविरोधात उद्याच 'महाराष्ट्र बंद'ची हाक?

उद्धव ठाकरे हे उद्या म्हणजेच शनिवारी जाहीर सभा घेणार आहेत. या सभेत उद्धव ठाकरे राज्यपालांविरोधात महाराष्ट्र बंदची हाक देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Buldana, India
  • Published by:  Shreyas

बुलढाणा, 25 नोव्हेंबर : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटत आहेत. उद्धव ठाकरे यांनी तर राज्यपालांचा उल्लेख पार्सल असा केला. हे पार्सल वृद्धाश्रमात पाठवा, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केलं. तसंच या मुद्द्यावरून महाराष्ट्र बंद करण्याचा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला.

उद्धव ठाकरे यांच्या या इशाऱ्यानंतर आता उद्या म्हणजेच शनिवारी त्यांची जाहीर सभा होत आहे. बुलढाण्याच्या चिखलीमध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होत आहे. या सभेतून उद्धव ठाकरे राज्यपालांविरोधात महाराष्ट्र बंदची हाक देणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

'केंद्राचं सॅम्पल वृद्धाश्रमात पाठवा', राज्यपालांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे आक्रमक

बंडखोरांवर काय निशाणा साधणार?

बुलढाणा जिल्ह्यातले दोन आमदार आणि एक खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंसोबत गेले आहेत. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड आणि मेहकरचे आमदार संजय रायमुलकर तसंच खासदार प्रतापराव जाधव एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत आहेत. तर विदर्भातल्याच यवतमाळ-वाशीमच्या खासदार भावना गवळी यासुद्धा शिंदेंसोबत आहेत.

प्रतापराव जाधव यांनी काही दिवसांपूर्वीच ठाकरेंसोबत असलेले 8 आमदार आणि 3 खासदार शिंदेंकडे येणार असल्याचा गौप्यस्फोट केला होता, त्यावरही उद्धव ठाकरे काय बोलणार? याकडे शिवसैनिकांचं लक्ष लागलं आहे. नोव्हेंबर महिन्यामध्येच आदित्य ठाकरे हे बुलढाण्याच्या दौऱ्यावर आले होते.

बाळासाहेबांनी हेच संस्कार दिले का? भाजपाचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

First published:

Tags: Governor bhagat singh, Uddhav Thackeray