मुंबई, 28 फेब्रुवारी : CNBC TV 18 इंडिया बिझनेस लीडर अॅवॉर्ड्स 2020 या कार्यक्रमात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत अर्थव्यवस्था, शेअर मार्केट, तेजी-मंदीचे विषय जड सुरू असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यासपीठावर येऊन वातावरण थोडं मोकळं केलं. देशातले नामवंत उद्योजक, अर्थतज्ज्ञ आणि माध्यमांच्या समोरच ठाकरे यांनी अर्थसंकल्प हा अवघड विषय असल्याचं मान्य केलं. आपण शिवसेना पक्षप्रमुख म्हणून कशी बजेटपूर्वीच प्रतिक्रिया तयार ठेवायचो, याचे किस्सेही त्यांनी सांगितले... उद्धव ठाकरे यांची 'अर्थ'पूर्ण फटकेबाजी पाहिलीच पाहिजे...
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.