• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • अजून नुकसान करायचं नसेल तर..,रामदास आठवलेंची उद्धव ठाकरेंना पुन्हा ॲाफर

अजून नुकसान करायचं नसेल तर..,रामदास आठवलेंची उद्धव ठाकरेंना पुन्हा ॲाफर

 'महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी ठाकरे यांनी भाजपसोबत आले पाहिजे, असे झाल्यास केंद्रातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होऊ शकतो'

'महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी ठाकरे यांनी भाजपसोबत आले पाहिजे, असे झाल्यास केंद्रातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होऊ शकतो'

अनेक वर्षांपासून मैत्री असलेली शिवसेना आणि भाजप एकत्र यावी हीच माझी भूमिका आहे.

 • Share this:
  शिर्डी, 08 ॲाक्टोबर : शिवसेना, (shivsena) काँग्रेस आणि राष्ट्रवादी (ncp) एकत्र आले तसं राजकारणात काहीही होवू शकतं. शिवसेना पुन्हा भाजपासोबत येवू शकते. सेनेला आपलं नुकसान करायचं नसेल तर अजूनही वेळ गेलेली नाही. बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजूनही विचार करावा, असं आवाहन केंद्रीय मंत्री रामदास आठवले (ramdas Athwale) यांनी पुन्हा एकदा केलं. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत आज शिर्डीत शेकडो कार्यकर्त्यांची घरवापसी झाली. यावेळी बोलत असताना रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना ॲाफर दिली. शिवसेना राष्ट्रवादी आणि काॅग्रेस एकत्र येवू शकते त्याप्रमाणे राजकारणात काहीही होवू शकतं. अनेक वर्षांपासून मैत्री असलेली शिवसेना आणि भाजपा एकत्र यावी हीच माझी भूमिका आहे. अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाच्या मुद्यावर हे एकत्र येवू शकतात. अजूनही वेळ गेलेली नसून बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विचार करावा. असं आवाहन आठवलेंनी केलं आहे. महाराष्ट्रातही आजवर अनेक घटना घडल्या आहेत मात्र, लखमीपुरचा विषय घेऊन मोदींवर टीका केली जात आहे. लखमीपूरच्या घटनेचं आम्हाला दु:ख आहे. ही घटना चिड आणणारी आहे. दोषींवर कारवाई झाली पाहिजे हिच आमची मागणी असून लखमीपूरच्या घटनेवरून मोदींना बदनाम करण्याचा डाव आहे मात्र आम्ही हा डाव उघळून लावू, असा इशारा रामदास आठवले यांनी दिला. केंद्रीय तपास यंत्रणा स्वतंत्र असून मोदी सरकार कुणावरही अन्याय न करणारं आहे..ज या ठिकाणी अनियमीतता आहे तीथे इडीची चौकशी होते. मुद्दाम कुणाला त्रास देण्याची आमची भूमिका नाही. ज्यांना धंदा पाणी करायचाय त्यांनी आपला हिशेब चोख ठेवला पाहिजे, असं म्हणत आठवलेंनी अजित पवार यांच्या चौकशीवर टोला लगावला.
  Published by:sachin Salve
  First published: