मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Uddhav Thackeray Live : 'मिंधे गट दिल्लीला मुजरा करायला गेलाय', उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर बाण

Uddhav Thackeray Live : 'मिंधे गट दिल्लीला मुजरा करायला गेलाय', उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर बाण

मुंबईमध्ये गटप्रमुखांच्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरूवात झाली आहे. सभेच्या सुरूवातीलाच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दसरा मेळावा आणि भाजपवर निशाणा साधला आहे.

मुंबईमध्ये गटप्रमुखांच्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरूवात झाली आहे. सभेच्या सुरूवातीलाच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दसरा मेळावा आणि भाजपवर निशाणा साधला आहे.

मुंबईमध्ये गटप्रमुखांच्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरूवात झाली आहे. सभेच्या सुरूवातीलाच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दसरा मेळावा आणि भाजपवर निशाणा साधला आहे.

  • Published by:  Shreyas
मुंबई, 21 सप्टेंबर : मुंबईमध्ये गटप्रमुखांच्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरूवात झाली आहे. सभेच्या सुरूवातीलाच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दसरा मेळावा आणि भाजपवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंच्या भाषणातले मुद्दे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बंधू-बघिनी आणि मातांनो, आज हे एवढं आहे, दसऱ्याला किती असेल? किती पटीत असेल, दसरा आपल्या पंरपरेप्रमाणे शिवतीर्थावरतीच होणार आणि शिवतीर्थावरच घेणार. व्यासपीठावर आल्यावर मी दोन गोष्टी बघितल्या. एक रिकामी खुर्ची पाहिली संजय राऊत यांची. एक खुलासा करुन टाकतो. नाहीतर, उद्या चौकट यायची संजय राऊत मिंदे गटामध्ये गेले. सगळे मिंदे तिकडे गेले आहेत. पण संजय राऊत मोडेन पण वाकणार नाही या निश्चयाने लढतोय. या लढाईत सोबत आहेत. ते तलवार हातात घेवून आघाडीवर आहेत. दुसरीकडे आमचे वडील आहेत ना जागेवर? कारण मुलं पळवणारी टोळी माहिती आहे. पण बाप पळवणारी टोळी सध्या महाराष्ट्रात फिरतेय. मला आश्चर्य वाटतंय की, एवढे वर्ष तुम्ही-आम्ही सगळ्यांनीच यांना सत्तेच दूध पाजलं, मानमर्यादा दिली आणि आता यांच्या तोंडाची गटारे उघडली आहेत. तुम्ही सर्वजण याला उत्तरे देत आहेत. विशेष म्हणजे मुंबईत आता गिधाडं फिरायला लागली आहेत. गिधाडांची लचके तोडणारी अवलाद फिरायला लागली आहेत. मुंबई भडकवायची आहे, मुंबई गिळायची आहे, तुम्ही गिळू देणार? लचके तोडू देणार? हे नवीन नाहीय. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचत मोठे झालेलो शिवसैनिक आहोत. स्वराज्य स्थापन केल्यानंतर अनेकजण स्वराज्यावर चालून आले होते. त्या कुळातले आताचे शाह, अमित शाह देशाचे गृहमंत्री मुंबईत येवून गेले आणि काय बोलून गेले की शिवसेनेला जमीन दाखवा. त्यांना माहिती नाही इथे जमिनीतून ही फक्त गवताची पाती नाहीत तर तलवारीची पाती आहेत. तुम्ही जमीन दाखवण्याचा प्रयत्न कराच तुम्हाला आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाही हे आजसुद्धा ठणकावून सांगतोय. एक गोष्ट लक्षात ठेवा, मी गिधाड हा शब्द मुद्दामनू वापरला. कारण आज मुंबईत निवडणूक आली म्हणून मुंबई दिसते. पण जेव्हा मुंबईवर संकट येतात तेव्हा ही गिधाडं कुठे असतात? मुंबई ही तुमच्यासाठी स्क्वेअर फुटात विकण्यासारखी जमीन असेल पण आमच्यासाठी मातृभूमी आहे. वंशवादावर टीका करणाऱ्यांचा वंश कोणता? पेंग्विन आणला हे अभिमानाने सांगतो तुमचं बरंय की रिअल इस्टेट विकायला जमीन पाहिजे. पण ही फक्त जमीन नाहीय तर आमची मातृभूमी आहे. मुंबादेवी ही आमची आई आहे. जो आमच्या मुंबाआईवर वार करायला येईल त्याचा राजकारणात कोथळा बाहेर काढल्याशिवार राहणार नाहीत. दुर्देवाने आईला गिळायला निघालेली माणसं आहेत. माणसं आहेत की जनावरं? ज्या शिवसेनेने तुम्हाला मोठं केलं, ज्या शिवसेनेने तुम्हाला सगळी पदं दिली, मी येताना बघत होतो रस्त्यावरती पाट्या आहेत. सुरत 232 किमी. अरे बापरे किती लांब जावं लागलं त्यांना? मला त्याबद्दल जास्त बोलायचं नाही. कारण पुन्हा दसरा येतोय. पण मी आज मुंबई बद्दल बोलणार आहे. तुमचा आणि मुंबईचा संबंध नेमका काय? कमळाबाई आणि मुंबईचा संबंध नेमका काय? मी कमळाबाई आज पहिल्यांदा बोललो कारण त्यांना मला जाणीव करुन द्यायची आहे की, म्हणे ही शिवसेना बाळासाहेबांची नाही. पण कमळाबाई हा शब्द बाळासाहेबांनी दिलेला आहे. ही तीच शिवसेना आहे. बघा भरगच्च भरलेली आहे. हे बघितल्यानंतर पुन्हा मुंबईवर हक्क सांगण्याचं धाडस करु नका. - मिंधे गट दिल्लीला मुजरा करायला गेलाय आमच्यावर वंशवाद-घराण्यावर टीका होते. कुटुंबियांवर टीका होते. मला माझ्या घराण्याचा अभिमान आहे. ज्या मुंबईवर तुमची वाकडी नजर पडली आहे, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत जनसंघ नव्हताच. त्या चळवळीत माझे आजोबा होते. चळवळीचं रण पेटला असताना निवडणुका आल्या आणि जनसंघाने एकी फोडली. हा इतिहास तुम्हाला माहिती हवा. त्यानंतर दुर्देवाने आपण त्यांच्यासोबत युती केली. २५ वर्षे आमच्या राजकीय आयुष्यातील युतीमध्ये सडली. ते मी आज पुन्हा बोलतोय. ही सगळी नालायक माणसं आपण जोपासली. मेहनत शिवसैनिकांनी घ्यायची आणि डोक्यावर हे राष्ट्रीय पक्ष बसणार. तुमचं कर्तृत्व काय होतं? करता-करता वरती पोहचलात काय आणि पोहचल्यानंतर आम्हाला लाथा मारायला आलात? आज मी तुमच्यासमोर आहे आणि आदित्य आहे. वंशवादावर टीका करणार असाल तर तुमचा वंश कोणता त्यावरच वाद आहे. कारण एवढे उपरे घेतले आहेत ते घेतल्यानंतर तुमचा बावनकुळे की एकसे बावनकुळे हेच कळत नाहीय. कशाला नको तिकडे बोलत आहात. माझं म्हणणं काय मुद्द्याचं बोला, कामाचं बोला. - मुंबईमध्ये जेव्हा संकट येतं तेव्हा शिवसैनिक पुढे असतो, तेव्हा भाजपवाले कुठे असतात? - आम्ही पेंग्विन आणले पण फोटो नाही काढले - महापालिका नाही मुंबईकरांची मनं जिंका - केलेल्या कामांची आम्ही जाहिरात केली नाही - व्हर्च्युअल क्लासरूम शिवसेनेची संकल्पना - 15 दिवसांमध्ये कोव्हिड सेंटर उभं केलं - पंढरीच्या वारीला कुणी परवानगी दिली? - पंतप्रधानांना राखी बांधायला हीच बहीण मिळाली? भावना गवळींनी राखी बांधल्यावरून उद्धव ठाकरेंचा निशाणा - भाजपने माणसं धुवायची मशीन काढली आहे. - भ्रष्टाचाराबाबत कोणत्या तोंडाने बोलतात? आधी खोक्यातून बाहेर या - रक्तपात झाला तर गद्दार आणि आपल्यात होईल, कमळाबाईचे कपडे साफ राहतील, कमळाबाईला डाव साधून द्यायचा नाही - भाजपने मुन्नाभाईसोबत घेतला आहे - पुढच्या आठवड्यात पंतप्रधान मुंबईत येत आहेत. मुंबई जिंकण्यासाठी पंतप्रधान येत आहेत, तपास यंत्रणा, केंद्रीय गृहमंत्री आहेतच, सोबत मुन्नाभाईही आहे. सगळेच तुटून पडले आहेत - मुंबई महापालिका निवडणूक महिन्याभरात घेऊन दाखवा, तेव्हाच महाराष्ट्राची निवडणूक लावून दाखवा, उद्धव ठाकरेंचं अमित शाह यांना आव्हान म्हणे, 70 वर्षांनंतर देशात चित्ता आणला. काय जाहीराती झाल्या? दार उघडल्यानंतर चित्ता करतो म्याँव. आम्ही अभिमानाने सांगतो आम्ही पेंग्विन आणले. चित्ता आणला ते चांगलंच केलं. आम्हीदेखील आणले पेंग्विन. सरकार असताना आम्ही निर्णय घेतले होते त्याला यांनी स्थगिती दिली. वरळीत आरे डेअरीच्या इकडे जागतिक दर्जाचं मत्सालय झालंच पाहिजे. त्यासाठी मी संमती दिली आहे. पण हे जर का मध्ये आणले आणि पुन्हा तिथे इमारती केल्या तर काय करणार? धारावीत जे आर्थिक केंद्र गुजरातला पळवलं आहे ते झालं पाहिजे. लोकांना घरं बांधा. मुंबई संपूर्ण देशाचं आर्थिक केंद्र आहे, त्या आर्थिक केंद्र शहरातून आर्थिक केंद्र तुमच्या राज्यात पळवता? आज वेदांत गेला. त्याबद्दल ते धांदात खोटं बोलत आहेत. लाज वाटली पाहिजे. कोणाची बाजू घेवून तुम्ही बोलत आहात? एकत्र प्रोजेक्ट आणूयात. एक-एक येणारे उद्योग हे निघून जात आहे आणि मिंदे गट नुसता शेळ्यासारखा होय महाराजा करत बसत आहेत. आज सुद्धा दिल्लीत गेलेत. दिल्लीज मुजरा आणि गल्लीत गोंधळ. ते मुजरा मारण्यासाठी दिल्लीत जातात. कितीवेळा झुकले असतील. पण महाराष्ट्राची बाजू दिल्लीत का सांगत नाहीत? सांगाना पंतप्रधानांना. वेदांताला केंद्राकडून भरघोस सवलती दिल्या जात आहेत. मग महाराष्ट्रात का सवलती दिल्या नाहीत. मुंबईकर शिवसेनेवर का विश्वास टाकतात याचा कधी विचार केलाय? शिवसेना म्हटल्यावर आधार, विश्वास आणि विकास आहे. मुंबईत अनेक आपत्त्या आल्या प्रत्येक वेळी शिवसैनिक धावून जातो.
First published:

Tags: Shivsena, Uddhav thackeray

पुढील बातम्या