मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अयोध्येनंतर उद्धव ठाकरेंचं 'चलो पंढरपूर'!

अयोध्येनंतर उद्धव ठाकरेंचं 'चलो पंढरपूर'!

EDS PLS TAKE NOTE OF THIS PTI PICK OF THE DAY::::::::Ayodhya: Shiv Sena chief Uddhav Thackeray during a press conference, in Ayodhya, Sunday, Nov. 25, 2018. (PTI Photo/Nand Kumar)  (PTI11_25_2018_000074B)(PTI11_25_2018_000204B)

EDS PLS TAKE NOTE OF THIS PTI PICK OF THE DAY::::::::Ayodhya: Shiv Sena chief Uddhav Thackeray during a press conference, in Ayodhya, Sunday, Nov. 25, 2018. (PTI Photo/Nand Kumar) (PTI11_25_2018_000074B)(PTI11_25_2018_000204B)

24 डिसेंबरला पंढरपूर इथं उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे अशी माहिती सेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली.

    पंढरपूर, 20 डिसेंबर : राम मंदिरासाठी अयोध्या दौरा करून आल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता पंढरपूरच्या दौऱ्यावर जाणार आहे. 24 डिसेंबरला पंढरपूर इथं उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे अशी माहिती सेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली. रामदास कदम पंढरपूरच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी कदम यांनी नमामी चंद्रभागा प्रकल्पाचाही घेतला आढावा घेतला. येत्या सोमवारी 24 डिसेंबरला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभ होणार आहे. याच दिवशी सायंकाळी चंद्रभागा नदीवर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आरती केली जाणार आहे. राम मंदिर आणि झोपलेल्या कुंभकर्णाला जागे करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या सभेचं आयोजन केल्याचं ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा दुपारी ४ वाजता तर चंद्रभागा नदीची आरती येथील इस्कॉन मंदिराच्या घाटावरून सायंकाळी ६ वाजता केली जाणार आहे. राज्यातील प्रमुख नद्यांच्या शुद्धीकरणाचा कालबद्ध कार्यक्रम पर्यावरण विभागामार्फत हाती घेण्यात आला आहे. यासाठी केंद्र सरकारच्या विविध परवानग्या मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाणार आहे. चंद्रभागेचं प्रदूषण रोखण्यासाठी आणि वारकऱ्यांना आवश्यक सेवा देण्यासाठी पर्यावरण विभागामार्फत निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. तसंच नदी प्रदूषण करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही कदम यांनी यावेळी दिली. ==========================
    First published:

    Tags: Ayodhya ram mandir, Pandharpur, Ram Mandir, Shivsena, Uddhav thackeray, उद्धव ठाकरे, पंढरपूर

    पुढील बातम्या