Home /News /maharashtra /

उद्धव ठाकरेंचा राजीनामा, फ्लोअर टेस्ट नाही, आता पुढे काय होणार?

उद्धव ठाकरेंचा राजीनामा, फ्लोअर टेस्ट नाही, आता पुढे काय होणार?

उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा (Uddhav Thackeray Resigns) राजीनामा दिला आहे. फक्त मुख्यमंत्रीपदच नाही तर त्यांनी विधानपरिषदेची आमदारकीही सोडली, त्यामुळे आता गुरूवारी फ्लोअर टेस्ट होणार नाही.

    मुंबई, 29 जून : उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा (Uddhav Thackeray Resigns) राजीनामा दिला आहे. फक्त मुख्यमंत्रीपदच नाही तर त्यांनी विधानपरिषदेची आमदारकीही सोडली. सुप्रीम कोर्टात चार तास झालेल्या सुनावणीनंतर गुरूवारी फ्लोअर टेस्ट होणार हे निश्चित झालं. सुप्रीम कोर्टाच्या या सुनावणीनंतर लगेचच मुख्यमंत्र्यांनी राजीनाम्याची घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यामुळे आता गुरूवारी बहुमताची चाचणी होणार नाही. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यामुळे आता महाविकासआघाडी सरकार कोसळलं आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आता सगळ्यात मोठा पक्ष असलेल्या भाजपला (BJP) तुमच्याकडे बहुमत आहे का, हे विचारेल. भाजपकडे बहुमत असेल तर ते त्याचं पत्र राज्यपालांना देतील, यानंतर राज्यपाल भाजपला सत्तास्थापनेसाठी बोलावतील. शपथविधीमध्ये सुरूवातीला मुख्यमंत्री आणि ठराविक महत्त्वाच्या मंत्र्यांचा शपथविधी होईल. शपथविधी झाल्यानंतर भाजपला विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करावं लागेल. बहुमत सिद्ध झाल्यानंतर उरलेल्या मंत्रीमंडळाचा शपथविधी घेण्यात येईल. काय म्हणाले मुख्यमंत्री? "गुळाच्या ढेपेला मुंगळा चिपकून बसतो, तसा मी चिपकून बसणारा नाही. मी गेल्या बुधवारीच वर्षा निवासस्थान सोडून माझ्या मातोश्री निवासस्थानी आलो. मी आज आपल्या सगळ्यांसमोर मुख्यमंत्रीपदाचा देखील त्याग करत आहे. आजपर्यंत आपण सगळ्यांनी मला खूप प्रेम आणि आशीर्वाद दिला. ठिक आहे, मी घाबरणारा नाही. पण कारण नसताना उद्या जे काही बंदोबस्तात शिवसैनिकांचं रक्त सांडेल त्या पापाचे धनी जे कुणी असतील त्यांना होऊद्या. मी होणार नाही. म्हणून मी शिवसैनिकांना सांगतोय, उद्या अजिबात मध्ये येऊ नका. जे काही व्हायचंय ते होऊद्या. त्यांचा गुलाल त्यांना उधळू द्या", असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी आज राजीनामा दिल्यानंतर केलं. "शिवसेनेला सत्तेतून खाली खेचलंत. शिवसेना प्रमुखांच्या मुलाला मुख्यमंत्रीपदावरुन उतरवलं, त्यांचे पेढे त्यांना खाऊ द्या आणि ज्यांना वाटायचेत त्यांना वाटू द्या", असं उद्धव ठाकरे म्हणाले.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Shivsena, Uddhav thackeray

    पुढील बातम्या