उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याने भाजपची डोकेदुखी वाढणार?

उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याने भाजपची डोकेदुखी वाढणार?

भाजपकडून 'मातोश्री'वर अद्याप कुठलाही संपर्क झालेला नाही.

  • Share this:

मुंबई, 30 ऑक्टोबर : राज्यातील सत्तेत कुणाला अधिक वाटा मिळणार, याबाबत भाजप आणि शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. शिवसेनेच्या आमदारांची उद्या महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत शिवसेनेचा विधानसभा पक्षनेता ठरवला जाणार आहे. मात्र भाजपकडून 'मातोश्री'वर अद्याप कुठलाही संपर्क झालेला नाही. याबाबत सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत कमी जागा मिळाल्याने बॅकफूटवर गेलेल्या भाजपला खिंडित पकडण्यासाठी शिवसेनेकडून सध्या शक्य तितके सर्व प्रयत्न केले जात आहेत. अशातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. 'जे जे शक्य होईल ते सर्व करणार,' असं सूचक वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केल्याची माहिती आहे. त्यामुळे सत्ता स्थापन करताना खातेवाटपाबाबत शिवसेना तडजोड करणार नसल्याचं स्पष आहे. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे भाजपची मात्र डोकेदुखी वाढणार आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा पूर्ण होत आला तरीही सत्ता स्थापनेचा गोंधळ मात्र अद्यापही संपलेला नाही. मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा भाजपच्या जागा कमी झाल्यानंतर शिवसेनेनं आता थेट मुख्यमंत्रिपदावर दावा केला आहे. मात्र भाजपचे नेतृत्व शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्यास अनुकूल नाही. असं असलं तरीही सत्तेत आपलं वजन वाढवण्यासाठी शिवसेनेकडून अजूनही हालचाली सुरूच आहेत.

निवडून आलेल्या अधिकाधिक अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. अशातच आता सहाव्या अपक्ष आमदाराने शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. साक्री विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या अपक्ष आमदार मंजुळा गावीत यांचाही शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देत असल्याचं अधिकृत पत्र त्यांनी दिलं. शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर यांच्या सोबत मंजुळा गावीत यांनी मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

आमदार मंजुळा गावीत यांच्या पाठिंब्यामुळे ऱाष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकारी म्हणून कार्यरत होत्या. साक्री विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार मोहन सुर्यवंशी यांचा 7 हजार मतांनी पराभव केला. मंजुळा गावीत यांच्या पाठिंब्यामुळे शिवसेनेचं विधानसभेतील संख्याबळ 62 वर पोहोचलं आहे.

'ठरलं ते झालं नाही तर...',युतीसंदर्भात संजय राऊत यांचं मोठं विधान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 30, 2019 06:04 PM IST

ताज्या बातम्या