युतीचा फॉर्म्युला आधीच ठरला आहे, लवकरच कळवू- उद्धव ठाकरे

युतीचा फॉर्म्युला आधीच ठरला आहे, लवकरच कळवू- उद्धव ठाकरे

भाजप आणि शिवसेना यांच्यात लोकसभा निवडणुकीच्यावेळीच विधानसभेसाठीचा फॉर्म्युला ठरला होता. त्या फॉर्म्युल्यात आता कोणताही बदल नाही असे त्यांनी ठामपणे सांगितले.

  • Share this:

मुंबई, 20 सप्टेंबर: राज्यातील विधानसभेची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता आहे.  या पार्श्वभूमीवर  शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषदेत त्यांनी युतीची लवकरच घोषणा होईल असे सांगितले. भाजप आणि शिवसेना यांच्यात लोकसभा निवडणुकीच्यावेळीच विधानसभेसाठीचा फॉर्म्युला ठरला होता. त्या फॉर्म्युल्यात आता कोणताही बदल नाही असे त्यांनी ठामपणे सांगितले.

काय म्हणाले उद्धव ठाकरे-

- शिवसेना आणि भाजपमध्ये कोणत्याही प्रकारचे गैरसमज नाहीत

- युतीची घोषणा लवकरच होईल

- लोकसभा निवडणुकीवेळी जागा वाटपाचे जे सूत्र ठरले होते तसेच राहणार आहे

- लोकसभेच्या वेळीच विधानसभेचा फॉर्म्युला ठरला

- आरे, नाणारला विरोध स्थानिकामुळेच

- अयोध्याप्रश्नी कोर्टाच्या निर्णयाची प्रतिक्षा

- 135-135 हा फॉर्म्युला मीडियाने पसरवला

- राम मंदीरासंदर्भात मोदींनी मारलेला टोला माझ्यासाठी नाही

- गेल्या 5 वर्षात शिवसेनेने सरकारला धोका दिला नाही

- दोन दिवसात युतीची घोषणा होईल

- शिवसेना-भाजपमध्ये कोणतीही खदखद नाही

- युतीच्या प्रश्नावर गोंधळण्यासारखं काही नाही

दरम्यान, प्ररचारात आघाडी घेतलेल्या भाजप आणि शिवसेनेची युती होणार हे सांगितलं गेलं तरी जागावाटपाचं अजून फायनल झालेलं नाही. शिवसेनेला जास्त जागा पाहिजे असून भाजप तेवढ्या जागा द्यायला इच्छुक नाही अशी माहिती आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिवसनेच्या मंत्र्यांची बैठक घेऊन चर्चा केली. तब्बल तासभर मंत्री आणि उध्दव ठाकरेंमध्ये चर्चा झाली. या बैठकीत उद्धव यांनी सर्व मंत्र्यांना चर्चेची माहिती दिली आणि आश्वस्त केलं की सन्मानपूर्वक जागा मिळाल्या तरच युती होणार आहे. मात्र, बोलणी सकारात्मक असल्याचंही त्यांनी सांगितलं अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

'युती होईल अशी परिस्थिती आहे. माझी भाजप नेत्यांबरोबर बोलणी सुरू आहे. सन्मानपूर्वक जागा मिळाल्यास युती होईल. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेकडून सुभाष देसाई आणि भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन हे चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंमधेही चर्चा सुरू आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांनी फार ताणून न धरल्यास पित्रूपक्ष संपल्यानंतर युतीची घोषणा होऊ शकते.' अशी चर्चा उद्धव ठाकरे आणि नेत्यांमध्ये झाली असल्याची माहिती आहेय

चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

युतीचा कुठलाही फॉर्म्युला अजून ठरलेला नाही. फॉर्म्युला अंतिम झाल्यावर लोकसभेप्रमाणे मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद होईल. अमित शाह या पत्रकार परिषदेला असतील की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही. युतीची घोषणा कधी होईल, तर लवकरात लवकर हाच शब्द योग्य ठरेल. नारायण राणेंच्या प्रवेशाबाबत शिवसेनेला विश्वासात घेऊन मुख्यमंत्री निर्णय घेतील असं त्यांनी याआधीच स्पष्ट केलंय.

काँग्रेस की भाजप? आजोबांनी कानात सांगितलं गुपित, पाहा VIDEO

Published by: Renuka Dhaybar
First published: September 20, 2019, 2:53 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading