काही जणांचा भांडाफोड करण्यासाठी अयोध्येला निघालोय -उद्धव ठाकरे

काही जणांचा भांडाफोड करण्यासाठी अयोध्येला निघालोय -उद्धव ठाकरे

अयोध्या दौऱ्यावर जाताना उद्धव ठाकरे हे शिवनेरी किल्ल्यावरील माती घेऊन जाणार आहेत. त्यासाठी शिवनेरीवर पोहचल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे.

  • Share this:

अद्वैत मेहता, पुणे, 22 नोव्हेंबर : 'मला ताकाला जाऊन भांडं लपवायचं नाही, मात्र काही जणांचं भांडाफोड करायचं आहे,' असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. अयोध्या दौऱ्यावर जाताना उद्धव ठाकरे हे शिवनेरी किल्ल्यावरील माती घेऊन जाणार आहेत. त्यासाठी शिवनेरीवर पोहचल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे.

'अयोध्याला जाऊन मी सभा घेणार नाही. तिथं साधू-संतांचा आशीर्वाद घ्यायला निघालोय. शरयू नदीच्या आरतीत सामील होणार,' असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी आपल्या अयोध्या दौऱ्याबाबत माहिती दिली.

विरोधकांवरही जहरी टीका

'टीका करणाऱ्या विरोधकांची किती लायकी आहे, हे मला माहीत आहे, विरोधकाना काय बोलायचं ते बोलू द्या,' असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर केला आहे. 'प्रथम बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक बांधा, मग राम मंदिर,' असा सल्ला देत विरोधकांनी उद्धव ठाकरे यांना अयोध्या दौऱ्यावरुन चिमटा काढला होता. त्याला उद्धव ठाकरे यांनी हे प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

- परवानगीचा प्रश्न नाही मी साधू संताना भेटायला चाललोय, सभा घ्यायला नाही

- विरोधकांची काय लायकी आहे माहीत आहे

- इथली पवित्र माती, शिवरायांचे आशीर्वाद ,तुमच्या शुभेच्छा घेऊन जातोय, नक्की चांगलं काही तरी घडेल

- पंचांग मुहूर्त नाही पाहिला

- अटलजी यांचं सरकार मिली जुली सरकार होतं, आत्ताचं मजबूत सरकार

- निवडणूक समोर दिसतेय म्हणूनच राम मंदिर मुद्दा घेतला

- अयोध्येत जाऊन आल्यावर मीडियाशी बोलणार

- राजकारण करण्यासाठी मी अयोध्येला चाललेलो नाही

- सर्वांनी एकत्र येऊन राम मंदिर अंतिम टप्प्यात नेलं पाहिजे

-शिवनेरीवरची ही केवळ माती नाही, शिवभक्तांच्या भावना आहेत

- ही माती तिथं पोहचल्यावर खऱ्या अर्थाने मंदिर बांधण्याला चालना मिळणार आहे

First published: November 22, 2018, 10:20 AM IST

ताज्या बातम्या