• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • मिलिंद देवरा जरा जपूनच बोला, उद्धव ठाकरेंचा थेट इशारा

मिलिंद देवरा जरा जपूनच बोला, उद्धव ठाकरेंचा थेट इशारा

आमची युती होण्याआधीच भाजपच्या तंबूत कशाला शिरले होते. शिवसेना येतेय तंबू साफसूफ करून ठेवायला शिरले का? अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीवर निशाना साधला.

  • Share this:
मुंबई, 09 एप्रिल : गेल्यावेळी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिला होता. पण शिवसेनेनं युती केल्यानंतर काही जणांच्या पोटात दुखू लागलं अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. आमची युती होण्याआधीच भाजपच्या तंबूत कशाला शिरले होते. शिवसेना येतेय तंबू साफसूफ करून ठेवायला शिरले का? अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीवर निशाना साधला. तर 'युती होणार नाही हे पाहून आधीच तंबूत शिरणारे हे कसले राष्ट्रवादी' असं उद्धव ठाकरे म्हणाले. मिलिंद देवरा जरा जपूनच बोला 'मिलिंद देवरा आज पाळण्यात असतील नाहीतर गोधडीत असतील. त्यांच्या वडिलांना बाळासाहेबांनी ओळख दिली. त्यांना महापौर केलं. नाहीतर  मुरली देवरांना कोणी ओळखलं असतं.' असंही उद्धव ठाकरे म्हणाले. ते पुढे म्हणाले की, 'आता त्यांचं निधन झालं. त्यामुळे जास्त काही बोलत नाही. पण मिलिंद देवरा जरा जपूनच बोला' असा थेट इशार उद्धव ठाकरे यांनी दिला. 'युती झाल्यावर आता आघाडीचा कोथळा बाहेर काढणार आहोत...' 'देशद्रोह्यांवर काँग्रेस गुन्हा दाखल करणार नाही असं सांगते. म्हणजे ते उद्या दाऊदला पंतप्रधान करतील.' अशी आक्रमक टीका राहुल गांधी यांनी केली आहे. तर 'या नालायक कार्ट्याच्या हातात उद्या देश देणार आहात का...?' असा घणाघातही राहुल गांधींवर केला. हेही वाचा : '7 वर्षात राजकारणासाठी माझी 100 एकर जमीन गेली' यावर स्पष्टीकरण देताना उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, 'मी असं कुणालाही बोलत नाही. पण जे हाल स्वातंत्रवीर सावरकरांनी जे भोगले. ते जाऊन बघा अंदमानला. राहुल गांधी मराठी शिक्षक लाव आणि 'माझी जन्मठेप' काय आहे ते शिकून घे.' 'तुम्ही 56 काय 156 जरी एकत्र आलात तरी भगवा फडकणारच' पहिल्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराचे अवघे 24 तास उरले आहेत. त्यामुळे प्रचारसभांची लगबग वाढली आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवार भावना गवळींच्या प्रचारार्थ आज उद्धव ठाकरेंची सभा आयोजित करण्यात आली होती. मतदारसंघातील राज्यमंत्री संजय राठोड आणि भावना गवळी यांचे मतभेद बघता उद्धव ठाकरेंचे भाषण महत्वाचं ठरलं. 'विरोधी पक्षाच्या फुग्याला खूप भोकं पडली आहेत, त्यामुळे आता हा फुगा फुगणार नाही तर तुम्ही 56 काय 156 जरी एकत्र आलात तरी भगवा फडकणारच' अशी टीका उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर केली होती. 'विरोधकांनी आरोप करा पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शेतकऱ्याबाबत बोलू नये. शरद पवार मुख्यमंत्री असताना गोवारींचा मोर्चा आला होता. त्यांना आज कोर्टाने न्याय दिला मात्र काँग्रेस सरकारने दिला नाही.' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी विऱोधकांवर जोरदार टीका केली. ते पुढे म्हणाले की, 'नाशिकमधून लाल बावटा घेवून शेतकरी आले होते. तेव्हा मी झेंड्याचा लाल रंग नाही तर त्यांच्या रक्ताचा लाल रंग बघितला आणि त्यांना मदत करण्याचे आदेश आमदार आणि मंत्र्याना दिले. पण गोवारी मोर्चावर तुम्ही केलेल्या गोळीबाराचं रक्त तुम्ही धुतलं पण जणता विसरली नाही. मला त्या घटनेची लाज वाटते.' 'मी कर्जमाफीसाठी प्रयत्न केला मात्र मला कर्जमाफी नको कर्जमुक्ती पाहिजे. माफी आरोपीला देतात. माझा शेतकरी आरोपी नाही' असंही उद्धव ठाकरे म्हणाले. बरं इतकंच नाही तर 'मी उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरेंचा सुपुत्र वचन देतो तुम्हाला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही' अशी शपथही उद्धव ठाकरे यांनी जनतेसमोर घेतली. VIDEO: प्रियांकांच्या रॅलीत 'मोदी.. मोदी..'च्या घोषणा; कार्यकर्ते आपसात भिडले
First published: