मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'उद्धव ठाकरेंनी राजीनामा देऊन मोठी चूक केली', 'सुप्रीम' सुनावणीनंतर पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं कारण

'उद्धव ठाकरेंनी राजीनामा देऊन मोठी चूक केली', 'सुप्रीम' सुनावणीनंतर पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं कारण

महाराष्ट्रामध्ये घडलेल्या सत्तानाट्याबाबत (Maharashtra Politics) आज सुप्रीम कोर्टामध्ये (Supreme Court) सुनावणी पार पडली. सुप्रीम कोर्टात आज झालेल्या सुनावणीनंतर काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राजीनामा देऊन मोठी चूक केल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

पुढे वाचा ...
    मुंबई, 20 जुलै : महाराष्ट्रामध्ये घडलेल्या सत्तानाट्याबाबत (Maharashtra Politics) आज सुप्रीम कोर्टामध्ये (Supreme Court) सुनावणी पार पडली. या सुनावणीमध्ये 1 ऑगस्ट ही पुढची तारीख देण्यात आली. सुप्रीम कोर्टात आज झालेल्या सुनावणीनंतर काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राजीनामा देऊन मोठी चूक केल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ते एबीपी माझासोबत बोलत होते. 'पक्षांतर बंदी घट्ट करण्याची संधी उद्धव ठाकरेंना होती, पण त्यांनी घाई गडबडीमध्ये राजीनामा दिला, ती फार मोठी चूक झाली. त्यांनी विधिमंडळाला सामोरं जायला पाहिजे होतं, आपलं म्हणणं मांडण्याची गरज होती. विधानसभेत चर्चा झाली असती, काँग्रेस-राष्ट्रवादीला तीन पक्षांचं सरकार का स्थापन केलं, हे महाराष्ट्राच्या जनतेला सांगता अलं असतं. तसंच भाजपचा यामध्ये काय रोल आहे, हे कदाचित स्पष्ट झालं असतं,' असं वक्तव्य चव्हाण यांनी केलं. 'वाजपेयींसारखं भाषण करून निघून जाणं हा पर्याय होता. तेही न करता मतदान करून घ्यायला पाहिजे होतं. मतदानामध्ये त्यांना मतं कमी पडली असती आणि त्यांचा पराभव जरी झाला असता, तरी पक्षांतरबंदी कायद्याचं उल्लंघन जनतेसमोर झालं असतं. प्रतोदांनी काढलेल्या व्हिपचं शिवसेनेच्या फुटीर गटाकडून उल्लंघन झाल्याचं लाईव्ह टीव्हीवर दिसलं असतं, ज्यामुळे आणखी अडचण निर्माण झाली असती,' असं चव्हाण म्हणाले. कोर्टाचा निर्णय योग्य हा प्रश्न गुंतागुंतीचा झाला आहे, त्यामुळे कोर्टाने सुनावणी पुढे ढकलण्याचा निर्णय योग्य आहे. पक्ष फुटलाच नाही, हा पक्षातला अंतर्गत वाद असल्यामुळे पक्षांतरबंदी कायदा लागू होणार नाही, असं सांगण्यात आलं, त्यामुळे मुलभूत प्रश्न उपस्थित झाले. हे प्रकरण सोपं नसल्याचं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडलं. पक्षांतरबंदी कायदा रद्द करण्याची गरज पक्षांतरबंदी कायदा कालबाह्य झाला आहे, त्यामुळे हा कायदा रद्द करण्याची गरज आहे. विश्वास किंवा अविश्वास ठरावावेळीच पक्षाचा व्हिप असावा अन्यथा असू नये, अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Prithviraj Chavan, Uddhav thackeray

    पुढील बातम्या