उद्धव ठाकरे यांनी दिली Coronavirus संकट संपवण्याची डेडलाईन; असा आहे प्लॅन

उद्धव ठाकरे यांनी दिली Coronavirus संकट संपवण्याची डेडलाईन; असा आहे प्लॅन

कोरोनाची साखळी तोडण्यात यशस्वी होऊ, तितक्या लवकर आपण बंधनमुक्त होऊ, असं सांगताना उद्धव ठाकरे यांनी अजून काही काळ लॉकडाऊन राहील, हे स्पष्ट केलं. पण त्याबरोबर याची डेडलाईनही आखून दिली आहे.

  • Share this:

मुंबई, 18 मे : महाराष्ट्रात अजून काही दिवस तर निर्बंध असतील, असं सांगताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेड झोनमधले निर्बंध फार शिथिल होणार नसल्याचं स्पष्ट केलं. पण त्याबरोबरच Coronavirus ची ही लढाई निर्णायक असेल याची आठवण करून दिली आणि हे संकट संपवण्याची डेडलाईनही जाहीर केली. उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या मार्फत जनतेशी संवाद साधला.

'कोरोनाची साखळी तोडण्यात यशस्वी होऊ, तितक्या लवकर आपण बंधनमुक्त होऊ', असं सांगताना उद्धव ठाकरे यांनी अजून काही काळ लॉकडाऊन राहील, हे स्पष्ट केलं. पुढचे काही महिने सावध राहायलाच हवं. पण हे संकट लवकरात लवकर संपवायचं आहे आणि ते आपण संपवणार, असा विश्वास व्यक्त केला.

हे संकट कुठल्याही परिस्थितीत पावसाळ्यापूर्वी संपवायचं आहे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. कारण पावसाळ्याबरोबर नवं शैक्षणिक वर्ष सुरू होतं. अॅडमिशन, प्रवेश परीक्षा यांची लगबग असते आणि कुठल्याही परिस्थितीत शैक्षणिक वर्ष वाया जाऊ द्यायचं नाही, असं ते म्हणाले. शाळा कशा सुरू करायच्या, परीक्षा, अॅडमिशन्स कशा घ्यायच्या यावर विचार सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.

मुख्यमंत्र्यांच्या संवादातले महत्त्वाचे मुद्दे

कोरोनानंतर जग बदलेल. कोरोनाबरोबर जगायची तयारी ठेवा.

घरात राहा, सुरक्षित राहा. घराबाहेर जाताना सावध राहा.

जनजीवळ रुळावर आणायचं आहे. पण त्यासाठी काही काळ आणखी जावा लागणार.

कोरोनाची साखळी तोडण्यात यशस्वी होऊ, तितक्या लवकर आपण बंधनमुक्त होऊ.

ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये आणखी काही निर्बंध शिथिल होणार.

क्षेत्रातल्या रेड झोन क्षेत्रांतल्या निर्बंधांमध्ये फारशी शिथिलता आणता येणार नाही.

धार्मिक सण, धार्मिक जमावांना परवानगी देता येणार नाही.

शाळा कशा सुरू करायच्या, परीक्षा, अॅडमिशन्स कशा घ्यायच्या यावर विचार सुरू.

महाराष्ट्रातल्या जनतेने आपल्या गावी जायची घाई करू नका.

परप्रांतीयांसाठी ट्रेनची सुविधा सुरू झाली आहे. हळूहळू आणखी ट्रेन वाढतील. तुम्ही उतावीळ होऊ नका. तुम्हाला सुरक्षितपणे तुमच्या राज्यात पाठवू.

कोरोनाचं संकट आल्याने अनेक स्थलांतरित मजूर आपापल्या गावी परत गेले आहेत. अजूनही परत चालले आहेत. पण आता राज्यातल्या उद्योगांचं काय करायचं?

मी भूमिपुत्रांना आवाहन करतो, की हे उद्योग सुरू व्हायला तुम्ही पुढे या. आत्मनिर्भर महाराष्ट्र उभा करू या.

आजपर्यंत 50 हजार उद्योग सुरू झाले आहेत. 5 लाख मजूर आणि कामगार काम करू लागले आहेत.

कुणालाही घरात डांबून ठेवणं यासारखी शिक्षा नाही. लॉकडाऊनचं चक्रव्यूह भेदणार आहोत की नाही, याचं उत्तर जगात कुणाकडे नाही. आपल्याकडेही नाही.

First published: May 18, 2020, 9:23 PM IST

ताज्या बातम्या