सेनेचा मुख्यमंत्री होण्यासाठी दाम्पत्याने केली होती पायी वारी, उद्धव ठाकरेंनी बोलावलं शिवतीर्थावर!

सेनेचा मुख्यमंत्री होण्यासाठी दाम्पत्याने केली होती पायी वारी, उद्धव ठाकरेंनी बोलावलं शिवतीर्थावर!

सांगलीच्या जत तालुक्यातील बनाळी येथील शिवसैनिक संजय सावंत आणि त्यांच्या पत्नी रूपाली सावंत हे दोघे बनाळीपासून पंढरपूरपर्यंत अनवाणी चालत आले होते

  • Share this:

विरेंद्र उत्पात, प्रतिनिधी

पंढरपूर, 27 नोव्हेंबर :  शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून अनवाणी चालत विठुरायाला साकडं घालणाऱ्या शिवसैनिकाची इच्छा अखेर पूर्ण झाली. शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि राज्याचे भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या दाम्पत्याचा सन्मान करण्यासाठी खास निमंत्रण दिलं आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर  सत्तासंघर्ष कमालीचा ताणला गेला होता. शिवसेनेचा मुख्यमंत्री होण्यासाठी आग्रही मागणी केली जात होती. मात्र चित्र स्पष्ट होतं नव्हतं.

सांगलीच्या जत तालुक्यातील बनाळी येथील शिवसैनिक संजय सावंत आणि त्यांच्या पत्नी रूपाली सावंत हे दोघे  बनाळीपासून पंढरपूरपर्यंत अनवाणी चालत आले होते. यासाठी त्यांना तीन दिवसांचा वेळ लागला होता. पंढरपुरात येऊन त्यांनी विठ्ठलास साकडं घातलं की, 'मुख्यमंत्री शिवसेनेचा व्हावा'. यानंतर त्यांनी चंद्रभागा पाण्याने भरलेला कलश आणि तुळशी अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी आलेल्या उद्धव ठाकरे यांना भेट दिली.

बऱ्याच नाटयमय घडामोडीनंतर आता उद्धव ठाकरे हे उद्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. सावंत यांना विशेष निमंत्रण आलं आहे. आज सकाळीच सावंत हे पुन्हा पंढरपूरला येऊन विठूरायाच्या चरणारवर नतमस्तक झाले.  आपण घातलेल साकड देवानं पूर्ण केलं. आता शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्याचं बळ मुख्यमंत्र्यांना मिळू दे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

===========

First Published: Nov 27, 2019 06:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading