मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

दूध दरवाढीबाबत 'ठाकरे सरकार' घेणार मोठा निर्णय? मंत्री सुनील केदार यांच्या उपस्थितीत बैठक सुरू

दूध दरवाढीबाबत 'ठाकरे सरकार' घेणार मोठा निर्णय? मंत्री सुनील केदार यांच्या उपस्थितीत बैठक सुरू

या बैठकीत नेमका काय निर्णय घेण्यात येतो, याकडे दूध उत्पादक शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

या बैठकीत नेमका काय निर्णय घेण्यात येतो, याकडे दूध उत्पादक शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

या बैठकीत नेमका काय निर्णय घेण्यात येतो, याकडे दूध उत्पादक शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

  • Published by:  Akshay Shitole

मुंबई, 21 जुलै : दूध दरवाढीची मागणी करत राज्यभरात भाजप, स्वाभिमानीसह अनेक संघटनांनी आंदोलन सुरू केलं आहे. दूध रस्त्यावर फेकत सरकारविरोधात आक्रमक आंदोलन सुरू आहे. सरकारने या आंदोलनाची दखल घेतली असून दूध दरवाढीबाबत महत्त्वपूर्ण बैठक सुरू झाली आहे. दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्या उपस्थितीत ही बैठक होत असून अनेक दूध उत्पादक शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीला हजर आहेत.

दुधाचा दर वाढवून मिळावा, या मागणीसाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे. त्यामुळे ठाकरे सरकारने या मागणीबाबत विचारमंथन सुरू केलं आहे. मंत्री सुनिल केदार यांच्या उपस्थितीत होत असलेल्या या बैठकीला महानंदांचे अधिकारीही उपस्थित आहेत. त्यामुळे या बैठकीत नेमका काय निर्णय घेण्यात येतो, याकडे दूध उत्पादक शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, 'आजच्या बैठकीत गाईच्या दुधाला 10 रुपये अनुदान द्यावं, ते शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जावं. मग ते दूध शेतकरी सहकारी संस्थेला देत असेल किंवा मग खासगी दूध संघाला देत असेल. याशिवाय दूध भुकटीलाही 50 रुपये अनुदान देण्यात यावं. हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी आजच्या बैठकीत घ्यावा. नाहीतर शेतकऱ्यांच्या संघर्षाला, एल्गाराला सरकारला 1 ऑगस्टला सामोरं जावं लागेल,' असा इशारा माजी कृषिमंत्री आणि भाजप किसान मोर्चा अध्यक्ष अनिल बोंडे यांनी दिला आहे.

दुसरीकडे, दूध दरवाढीच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन होत असताना अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे पाषाणाला दुधाचा अभिषेक घालत मोफत दूध वाटप करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध केला आहे. दुधाला प्रतिलिटर 5 रूपये अनुदान द्या, दूध भुकटी आयात बंद करा, जी.एस.टी.रद्द करा तसेच दूध दरवाढ करा अशा मागण्या करत स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले आहे.

First published:

Tags: Uddhav thackeray