उस्मानाबाद, 06 नोव्हेंबर : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी खबरदारीचा उपया म्हणून अद्यापही राज्यातील शाळा आणि मंदिरं बंद ठेवण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला आहे. राज्यातील महत्त्वाची देवस्थानं भाविकांसाठी उघडण्यात यावीत यासाठी भाविक आणि नागरिकांकडून वारंवार मागणी केली जात आहे. तुळजापुरात तुळजाभवानी मंदिर भक्तांसाठी उघडावं यासाठी नागरिकांनी आंदोलन केलं आहे. जोपर्यंत ठाकरे सरकार मंदिरं खुली करण्याचा निर्णय घेत नाही तोपर्यंत आंदोलन स्थगित करणार नाही या निर्णयावर आंदोलक ठाम आहेत.
तुळजापुरातील आंदोलकांचा तंबू प्रशासनाकडून काढण्यात आला आहे. तरीही आपण आज आंदोलन करणारच असल्याच्या भूमिकेवर आंदोलक ठाम आहेत.यामुळे या आंदोलनादलम्यान आज वाद उफाळण्याची शक्यता आहे. राज्यातील मंदिरे खुली करा यासाठी कालपासून भाजपाच्या अध्यात्मिक समन्वय सेलच्या वतीने तुळजाभवानीच्या मंदिरासमोर धरणे आंदोलन सुरू आहे.
हे वाचा-
या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. शुक्रवारी सकाळी 8 वाजल्यापासून होम हावन करूण तुळजाभवानी च्या दारासमोर आज चंडी यज्ञ करण्यात येणार आहे.पोलीसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली होती मात्र तरीही आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम असल्यानं प्रशासनानं कारवाई केली. त्यामुळे आता हे आंदोलन कस पुढे जाणार हे पाहावे लागणार आहे.
कोरोनाचा संसर्ग आणि धोका पाहून ठाकरे सरकारनं राज्यातील मंदिरं आणि शाळा अद्यापही बंद ठेवल्या आहेत. बऱ्यापैकी कमी होणारा कोरोनाची आकडेवारी हाताबाहेर जाऊ नये आणि राज्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ नये यासाठी प्रशासनाकडून खबरदारीसाठी मंदिरं बंद ठेवण्यात आली आहेत. मात्र ही मंदिरं आता भाविकांसाठी तातडीनं खुली करावी ही मागणी विरोधी पक्षांसह नागरिकही जोर लावून धरत आहेत.