अखेर सामनातील नाणार जाहिरातीवर उद्धव ठाकरेंचा खुलासा

अखेर सामनातील नाणार जाहिरातीवर उद्धव ठाकरेंचा खुलासा

उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. यावेळा सिंधुदूर्गमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

  • Share this:

सिंधुदूर्ग, 18 फेब्रुवारी : गेल्या काही दिवसांपासून कोकणात होणाऱ्या नाणार रिफायनरी प्रकल्पासंदर्भात शिवसेनेच्या मुखपत्र असलेल्या सामनात आलेल्या जाहिरातीवरून कोकणात वातावरण चांगलंच तापलं आहे. यावरून आधी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या शिवसेनेनं आता भूमिका बदलल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यावर अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माध्यमांसमोर खुलासा केला. याआधीही नाणारला विरोध होता आणि यापुढेही असेन अशी ठाम भूमिका मुख्यमंत्र्यींनी मांडली.

उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. यावेळा सिंधुदूर्गमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी सामनातील नाणार जाहिरातीवर प्रश्न विचारला असता, सामनामध्ये बद्धकोष्ठाचीदेखील जाहिरात येते असं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं. ते पुढे म्हणाले की, 'शिवसेनेचे सर्व निर्णय आणि शिवसेनेची भूमिका मी ठरवतो. कोणताही जाहिरातदार शिवसेनेची भूमिका ठरवत नाही. त्यामुळे शिवसेनेची भूमिका बदललेली नाही. नाणार प्रकल्पाला आधाही शिवसेनेचा विरोध होता आणि यापुढेही राहिन. आणि रिफायनरीचा विषय हा कधीच बंद झाला आहे. त्यावर आता बोलून काही फायदा नाही'

उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

- एलईडी मासेमारी रोखण्यासाठी नव्या गस्ती नौका पुरवणार आणि यावर कडक कायदा करणार

- शिवसेनेची भूमिका मी ठरवतो , जाहिरातदार नाही

- वायरॉलॉजी लॅब येत्या एप्रिलपासून सुरु करणार

- भीमा कोरेगावचा तपास मी केंद्राकडे दिलेला नाही

- एल्गारचा विषय वेगळा आहे. तो केंद्राकडे सोपवण्यात आला आहे

- सीएए आणि एनआरसी दोन वेगळे विषय

- एनपीएत काही अडचणी येतील असं मला वाटत नाही

दरम्यान, सामनातील नाणार जाहिरातीमुळे शिवसेनेवर टीकेची झोड उठवण्यात आली होती. माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनीही यावर टीका केली होती. नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता.

नाणार प्रकल्पाबाबत मुंबईत माध्यमांशी बोलताना नारायण राणे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. राणे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसारखा दिशाभूल करणारा माणूस नाही. आधी नाणारला विरोध केला आता जाहिरात छापली. उद्धव ठाकरे दुतोंडी माणूस, अशा शब्दांत राणे यांनी घणाघाती प्रहार केला आहे. हे सरकार चालत नाही आहे. मुख्यमंत्र्यांच्या दालनासह मंत्रालयात सगळीकडे भ्रष्टाचाराची दुकानं चालतायत. सर्व कामाना स्थगिती देत आहे. हे सरकार गेल्याशिवाय महाराष्ट्रातील जनतेला चांगले दिवस येणार नाहीत, अशी खोचक टीका नारायण राणे यांनी केली होती.

First published: February 18, 2020, 11:24 AM IST

ताज्या बातम्या