मुंबई, 30 मार्च : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. काही काळासाठी जरी त्यांनी धनुष्यबाण चोरलं असलं तरी प्रभू राम माझ्यासोबत आहेत. त्यावेळी प्रभू रामाचं नाव लिहून दगड तरंगत होती, आता राजकारणात प्रभू रामाचं नाव घेऊन ते तरंगत आहेत, असा जोरदार टोला उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना लगावला आहे. उद्धव ठाकरे रामटेकवरून भेटण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना बोलत होते.
नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
कोणीतरी एखाद्यासाठी एवढ्या किलोमीटरपर्यंत पायपीट करत येणं अशक्य आहे. मातोश्रीवर येऊन तुम्हाला माझ्यासोबत उभं राहावं वाटतं, याला मी रामाचा आशीर्वाद मानतो.
राम सेतू बांधताना वानर सेना होतीच पण खार सुद्धा होती, मग आपण एकत्र आलो तर लंकादहन का करू शकत नाही? तुम्ही रामटेकवरून निघालात आणि राम नवमीला इथे पोहोचलात, असं उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटलं आहे.
Video : 'हिंदू शेरणी नवनीत राणा', उद्धव ठाकरेंना पुन्हा डिवचले; मातोश्रीबाहेर लागले पोस्टर
विरोधकांना टोला
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांना देखील जोरदार टोला लगावला आहे. काही काळासाठी जरी त्यांनी धनुष्यबाण चोरलं असलं तरी प्रभू राम माझ्यासोबत आहेत. त्यावेळी प्रभू रामाचं नाव लिहून दगड तरंगत होती, आता राजकारणात प्रभू रामाचं नाव घेऊन ते तरंगत आहेत. आता दगडच तरंगतात आणि दगडच राज्य करतात. आपल्या देशाला स्वातंत्र हे केवळ 75 वर्षांपूरतच होतं का? असा प्रश्न पुढची पिढी आपल्याला विचारेल. कागदावरचं धनुष्यबाण जरी त्यांनी नेलं असलं तरी बाण माझ्या भात्यात आहेत. ब्रम्हास्त्र माझ्यासोबत असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eknath Shinde, Shiv sena, Uddhav Thackeray