मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'केंद्राचं सॅम्पल वृद्धाश्रमात पाठवा', राज्यपालांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे आक्रमक

'केंद्राचं सॅम्पल वृद्धाश्रमात पाठवा', राज्यपालांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे आक्रमक

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Ajay Deshpande

मुंबई, 24 नोव्हेंबर : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा त्यांनी जोरदार समाचार घेतला. राज्यपालांकडून महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळ चालू आहे. मी त्यांना राज्यपाल म्हणंण बंद केलं आहे. वृद्धाश्रमातही ज्यांना जागा नाही, त्यांना राज्यपाल नेमलं जातं. महाराष्ट्र द्रोह्यांना इंगा दाखवण्यासाठी सर्वांनी एकत्र या. केंद्रान पाठवलेलं हे सॅम्पलं वृद्धाश्रमात पाठवा असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

नेमकं काय म्हणालेत उद्धव ठाकरे? 

उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला आहे. ज्यांना वृद्धाश्रमातही जागा नाही त्यांना राज्यपाल म्हणून नेमलं जातं. केंद्रात ज्यांचं सरकार असतं त्यांच्या माणसांची राज्यपाल म्हणून नियुक्ती होते. राज्यपालांचा महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळ चालू आहे. राज्यपालांना हटवण्यासाठी सर्वांनी एकत्र या. महाराष्ट्र द्रोह्यांना इंगा दाखवलाच पाहिजे. केंद्रान पाठवलेलं हे सॅम्पलं वृद्धाश्रमात पाठवा असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

हेही वाचा :  राज्यपालांच्या विधानानंतर उद्धव ठाकरे आक्रमक, महाराष्ट्र बंदचा इशारा

शिंदे फडणवीस सरकावर टीका  

दरम्यान यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर देखील जोरदार टीका केली आहे. राज्यातील अनेक उद्योगधंदे बाहेर गेले. मिंधे, खोके सरकारमुळे राज्याची अवहेलना सुरू आहे. कुणीही येतय टपली मारून जातय अशी राज्याची अवस्था झाली आहे. राज्याला मुख्यमंत्री आहेत का असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

First published:

Tags: Uddhav Thackeray