... तर इम्तियाज जलील यांचाही 'औरंग्या' झाल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचे खडेबोल

... तर इम्तियाज जलील यांचाही 'औरंग्या' झाल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचे खडेबोल

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त औरंगाबादमधील सिद्धार्थ उद्यानात आयोजित कार्यक्रमाला MIMचे खासदार इम्तियाज जलील यांनी दांडी मारली. यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून इम्तियाज जलील यांचा चांगल्याच शब्दांमध्ये समाचार घेतला आहे.

  • Share this:

मुंबई, 19 सप्टेंबर : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त औरंगाबादमधील सिद्धार्थ उद्यानात आयोजित कार्यक्रमाला MIMचे खासदार इम्तियाज जलील यांनी दांडी मारली. यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून इम्तियाज जलील यांचा चांगल्याच शब्दांमध्ये समाचार घेतला आहे. 'मराठवाड्यानं औरंगजेबाला गाडले, निजामाला गुडघे टेकायला लावले. इम्तियाज जलील यांनी निजामाची चाटुगिरी थांबवली नाही तर त्यांचाही 'औरंग्या' झाल्याशिवाय राहणार नाही. मराठवाडा मुक्ती संग्रामातील हुतात्मा स्मारकासमोर संभाजीनगरची जनताच तुम्हाला गुडघे टेकायला लावेल. आता शासनाने एक करावे, स्वातंत्र्य सेनानींचा हा असा अपमान करणाऱया खासदारास कोणत्याही शासकीय सोहळय़ास बोलावू नये. देवेंद्रजी, काढा हा फतवा! महाराष्ट्रभूमीत अशा जलीलगिरीस थारा मिळता कामा नये!', अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी जलील यांना खडेबोले सुनावलेत.

काय आहे आजचे सामना संपादकीय?

- मराठवाडा मुक्ती संग्रामाचे ध्वजारोहण व त्यातील स्वातंत्र्यसैनिकांना मानवंदना देण्याचा शासकीय सोहळा प्रत्येक वर्षी 17 सप्टेंबर रोजी संभाजीनगरात पार पडतो. या वर्षीही तो झाला, पण सध्याचे खासदार जलील यांनी सलग पाचव्यांदा ध्वजारोहण सोहळय़ावर बहिष्कार टाकून स्वातंत्र्य सेनानींचा अपमान केला व निजाम तसेच त्याच्या जुलमी रझाकारी फौजांना सलाम केला.

- जलील हे मागची साडेचार वर्षे आमदार होते. तेव्हाही त्यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम सोहळय़ाकडे पाठ फिरवली व आता खासदार झाल्यावरही त्यांनी पुन्हा तेच शेण खाल्ले आहे.

(वाचा : 'विजयाचा अहंकार असू नये' : पक्षाध्यक्षांच्या उपस्थितीत गडकरींचा टोल)

- गेली पाचेक वर्षे मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या ध्वजारोहण सोहळय़ाचे खास आमंत्रण असतानाही जलील तेथे हजर राहत नाहीत हा प्रकार संतापजनक आहे.

(वाचा : पुण्यात या 4 जागांवर शिवसेनेचा डोळा.. शहर प्रमुखपदी या नेत्याची लागली वर्णी)

-  मराठवाडा आणि हैदराबादेत निजामाची पिलावळ फूत्कार सोडीत आहे. - ‘एमआयएम’ पक्षाचे पुढारी मियाँ ओवेसी हे ऊठसूट संविधानावर हात ठेवून आम्ही कसे देशभक्त आहोत याचे खुलासे करीत असतात, पण ट्रिपल तलाक, समान नागरी कायदा, वंदे मातरम् म्हणण्यापासून मराठवाडा मुक्ती संग्रामापर्यंत त्यांच्या भूमिका ते देशभक्त असल्याचे सिद्ध करीत नाहीत.

(वाचा : नाणारवरून शिवसेनेचा U टर्न? आदित्य ठाकरेंचं स्वागतासंदर्भात सूतोवाच)

- ‘एमआयएम’ हा निजामाचा वंश असेल तर त्यांनी तसे स्पष्ट करावे; कारण बनावट देशभक्तीचे त्यांचे ढोंग संभाजीनगरात उघडे पडले आहे.

- संभाजीनगरातील मतदारांनी गळय़ात ही कोणती धोंड बांधून घेतली आहे? याचा पश्चाताप त्यांना झाल्याशिवाय राहणार नाही.

Special Report : 'पवारसाहेब भाकरी फिरली कुठे?'

First published: September 19, 2019, 7:00 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading