मुंबई, 24 ऑगस्ट : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून नोटबंदी निर्णयावरून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. 'लोकसभा सचिवालयाच्या अंतर्गत 'नॅशनल इन्फोर्मेटिक्स सेंटर' संस्थेनं नोटाबंदीनंतरच्या भ्रष्टाचाराची पोलखोल केली आहे. नोटाबंदीनंतर देशातील भ्रष्टाचारात वाढ झाल्याची कबुली अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली आहे. अर्थमंत्र्यांनी अत्यंत धाडसानं सत्य सांगितलं. सरकार अधिकारावर येताच एक एक घुसखोर पकडून बाहेर काढू या घोषणेप्रमाणेच भ्रष्टाचार निर्मूलनाच्या घोषणेचे काय झाले? विकासाचे स्वप्न कसे खोटे आहे ते परवा बिहारात दिसले. देशाच्या अर्थव्यवस्थेचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार सुरू आहेत काय? ते लवकरच दिसेल', अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडलं आहे.
काय आहे आजचे सामना संपादकीय?
- नोटाबंदीनंतर देशातील भ्रष्टाचारात वाढ झाल्याची कबुली अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली आहे. अर्थमंत्र्यांनी अत्यंत धाडसानं सत्य सांगितलं. आजार लपवला तर उपचार करता येणार नाही. आजार लपवणारा रोगी शेवटी मरण पावतो. देशात दोन गोष्टींनी थैमान मांडले आहे. आर्थिक मंदी आणि त्यातून निर्माण झालेला भ्रष्टाचाराचा भस्मामुर.
- मंदी आणि बेरोजगारीचे मूळ नोटाबंदीच्या निर्णयात आहे. सीतारमण सांगतात तो भ्रष्टाचार नोटाबंदीनंतरचा म्हणजे गेल्या साडेतीन वर्षांतला आहे. हा भ्रष्टाचार नक्की कोणत्या प्रकारचा, कोणी केला, त्यांच्यावर काय कारवाई केली याचे दाखले अर्थमंत्र्यांनी दिले असते तर बरे झाले असते.
(वाचा : भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू)
- चिदंबरम यांच्याबाबतीत जे युद्ध सीबीआय व ईडी आज करीत आहे ते निरव मोदी, मल्ल्या किंवा इतरांच्या बाबतीत झाले नाही. ममता बॅनर्जी यांच्या सहकाऱयांनी ‘शारदा चिट फंड घोटाळा’ केला. हा भ्रष्टाचार आहेच. त्या भ्रष्टाचाराचे मुख्य सूत्रधार मुकुल राय हे मात्र मुक्त संचार करीत आहेत.
- चिदंबरम यांना बांबू लावला तसा इतर मंडळींनाही तो लावला तरच भ्रष्टाचारास बूच बसेल.
- जुन्यांचा भ्रष्टाचार चिदंबरम यांच्या रूपाने शिक्षा भोगणारच आहे, पण सीतारमण म्हणतात त्याप्रमाणे नोटाबंदीनंतर नक्की कुणाचे उखळ पांढरे झाले ते शोधण्यात सरकार कमी पडले.
(वाचा : 'यंदा लेकाला आशीर्वाद द्या', धनजंय मुंडेंची परळीकरांना भावनिक साद)
- नोटाबंदीनंतर देशात चलनातील रोकड वाढली असून याचा थेट संबंध बेकायदेशीर कामांशी आहे. 4 नोव्हेंबर 2016 ला देशात 17,174 बिलियन रुपयांचे रोख सर्क्युलेशन होते. तेच आता 29 मार्च 2019 ला वाढून 21,137 बिलियनपर्यंत पोहोचले. म्हणजे चलनातील वाढलेली रोकड संशयास्पद आहे.
- कोणीतरी खात आहेत व खाणाऱयांना सरकारी पातळीवर पाठबळ मिळत आहे. पैशांचा काळाबाजार व भ्रष्टाचार हा सहमतीने होत असतो. लोकसभा सचिवालयाच्या अंतर्गत ‘नॅशनल इन्फोर्मेटिक्स सेंटर’ आहे. या संस्थेने नोटाबंदीनंतरच्या भ्रष्टाचाराची पोलखोल केली आहे.
(वाचा : राज ठाकरेंची चौकशी करणाऱ्या EDला 'मनसे'ची नोटीस!)
- सरकार अधिकारावर येताच एक एक घुसखोर पकडून बाहेर काढू या घोषणेप्रमाणेच भ्रष्टाचार निर्मूलनाच्या घोषणेचे काय झाले? मोदी यांनी ‘नवा भारत’ म्हणजे ‘Modern India’ची घोषणा केली तो ‘भारत’ सगळय़ांची काळजी घेणारा असावा हे स्वप्न होते, पण नव्या भारतात गेल्या दोन वर्षांत दोन कोटींवर लोकांना नोकऱया गमवाव्या लागल्या.
- देशाच्या अर्थव्यवस्थेचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार सुरू आहेत काय? ते लवकरच दिसेल.
भाजप प्रवेशाबाबत उदयनराजे भोसले काय म्हणाले? पाहा VIDEO