कुलभूषण यांना सहिसलामत आणणे हाच सरकारचा खरा पुरुषार्थ ठरेल-उद्धव ठाकरे

कुलभूषण यांना सहिसलामत आणणे हाच सरकारचा खरा पुरुषार्थ ठरेल-उद्धव ठाकरे

मोदी व शहा यांनी मनात आणले तर काय अशक्य आहे? जाधव यांच्या सुटकेसाठी बळाचा वापर करावा लागेल, इतकेच आम्ही सांगू शकतो - उद्धव ठाकरे

  • Share this:

मुंबई, 19 जुलै : भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांच्याप्रमाणेच आता कुलभूषण जाधव यांनाही सुखरूप मायदेशी परत आणावं, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. यासंदर्भात सामना संपादकीयमधून त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. 'पुलवामा हल्ल्यानंतर हिंदुस्थानी हवाई दलाने पाकच्या हद्दीत घुसून तेथील दहशतवादी तळांवर हल्ले केले. आपल्या हवाई दलाचा वीर अभिनंदन पाकच्या हाती सापडला, पण आंतरराष्ट्रीय दबावांचा परिणाम व मोदी सरकारची भीती यामुळे अभिनंदनला पाकड्यांनी मुक्त केले. मग ते भाग्य कुलभूषण जाधव व त्यांच्या कुटुंबीयांना का मिळू नये? जाधव यांनी देशसेवा केलीच आहे व हिंदुस्थानचा सुपुत्र म्हणूनच पाकने त्यांना पकडून एकप्रकारे जुलूमच चालवला आहे. अभिनंदनची सहिसलामत सुटका झाली हा आनंदच आहे, पण कुलभूषण जाधवांची सुटका करून त्यांना सहिसलामत मायभूमीत आणणे हाच सरकारचा खरा पुरुषार्थ ठरेल. मोदी व शहा यांनी मनात आणले तर काय अशक्य आहे? जाधव यांच्या सुटकेसाठी बळाचा वापर करावा लागेल, इतकेच आम्ही सांगू शकतो', असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

(पाहा :SPECIAL REPORT : 'टिक टॉक'ची बोलती बंद होणार, सरकार पुन्हा अ‍ॅक्शन मोडमध्ये?)

काय आहे आजचे सामना संपादकीय?

- हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीस तूर्त स्थगिती दिली आहे. हिंदुस्थानचा हा विजय असल्याचे सांगितले जात आहे. ज्या दिवशी कुलभूषण जाधव हिंदुस्थानात परत येतील तो विजय दिवस मानता येईल. तसे काही झाल्याचे दिसत नाही.

- पाकिस्तानने ‘व्हिएन्ना’ समझोत्याचे उल्लंघन केले असल्याचे ताशेरे हेगच्या न्यायालयाने मारले, पण हिंदुस्थानच्याही सर्वच मागण्या मान्य केल्याचे दिसत नाही.

(पाहा :SPECIAL REPORT : कोळी महिलांवर बीएमसीकडून अन्याय? राज ठाकरेंनी दिला पाठिंबा)

- हेग न्यायालयाने सुनावले आहे की, या संपूर्ण प्रकरणाची नव्याने ‘ट्रायल’ म्हणजे सुनावणी व्हावी. दुसरे असेही सांगितले की, जाधव यांना वकिलांना भेटण्याची परवानगी मिळावी. व्हिएन्ना करारानुसार तो जाधव यांचा अधिकार आहे. जाधव यांना हेरगिरीच्या आरोपावरून अटक करताना कोणत्याही सूचना दिल्या गेल्या नाहीत. हासुद्धा व्हिएन्ना कराराचा भंग आहे.

- कायद्यासंदर्भात माहिती घेणे हा जाधव यांचा हक्क होता, पण त्यांना अंधारात ठेवले. कुलभूषण जाधव यांना 2016 साली बलुचिस्तानमधून पाक सैन्याने अटक केली. हेरगिरी व दहशतवादासारखे आरोप ठेवून पाक लष्करी न्यायालयाने जाधव यांना फाशीची शिक्षा ठोठावली.

- हेगच्या न्यायालयाने एक समतोल निर्णय देण्याचा प्रयत्न केला, पण हा निर्णय पाकडे मानतील काय?

(पाहा :आदित्य ठाकरेंना का हवाय 'जन आशीर्वाद', काय आहे 'मातोश्री'च्या मनात?)

- लष्कराचा मार्शल लॉ व अतिरेक्यांचा ‘इस्लामी लॉ’ यामुळे पाकचा नरक बनला आहे. त्या नरकातून कुलभूषण जाधव यांना हिंदुस्थान कसे बाहेर काढणार? जाधव हे काही कसाब किंवा हाफीज सईद नाहीत.

- आपले सरकार जाधव यांच्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहे हे मान्य केले तरी ‘लातों के भूत बातों से नहीं मानते’ हेच पाकिस्तानच्या बाबतीत सत्य आहे.

या 10 दिवसात आघाडीला पडणार खिंडार, चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट

First published: July 19, 2019, 7:42 AM IST

ताज्या बातम्या