युतीचं 'भवितव्य' आज ठरणार? शिवसेनेनं बोलावली महत्त्वाची बैठक

युतीचं 'भवितव्य' आज ठरणार? शिवसेनेनं बोलावली महत्त्वाची बैठक

या बैठकीत अमित शहांच्या वक्तव्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसच याच बैठकीत युतीच्या भवितव्याचा फैसलाही होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे.

  • Share this:

मुंबई 7 जानेवारी : भाजपचे अमित शहांनी रविवारी कलेल्या भाषणाचे राजकीय पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. त्या वक्तव्यावर शिवसेनेने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तर उद्धव ठाकरे यांनी बदलत्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी शिवसेना नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत अमित शहांच्या वक्तव्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसच याच बैठकीत युतीच्या भवितव्याचा फैसलाही होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे.

काय म्हणाले अमित शहा?

राज्यात युती झाली तर ठिक, नाहीतर विरोधियोंको 'पटक' देंगे  असा इशारा रविवारी अमित शहांनी लातूर इथं पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना दिला. शहांचा हा इशारा नेमका कुणाला आहे यावर आता चर्चा सुरू झालीय. कार्यकर्त्यांनी प्रत्येक बुथ कसं जिंकता येईल ते बघावं असं आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांनी केलं.

युती होईल की नाही त्या विचार करू नका. प्रत्येक बूथ जिंकण्याचा प्रयत्न करा. युती झाली नाही तरीही हरकत नाही विरोधकांचा पराभव करू.

शहांच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे

2019 ची तिसरी पानिपतची लढाई आपण हरलो तर इतिहास बदलेल. 2019 काहीही करून जिंकायची आहे...कारण मोदी आपले नेतृत्व करत आहेत.

राहुल गांधींनी आपल्या खानदानाचा इतिहास पहिल्यांदा बघावा त्यानंतर इतरांवर भ्रष्टाचाराचे आरोप करावेत.

राफेल प्रकरणी सुप्रीम कोर्टने चौकशी करण्याची आवश्यकता नाही असं म्हटलं आहे.

भाजपने राज्यात आणि केंद्रात एक पैशाचाही भ्रष्टाचार केला नाही. मोदी गरीब कुटुंबातून आले आहेत तरी ते देशाच्या उच्च पदावर पोहचले आहेत.

जलयुक्त शिवार मुळे महाराष्ट्रातील पाण्याची पातळी वाढली. हे देवेंद्र फडणवीस यांचं यश आहे.

निवडणूक जिंकण्यासाठी भाजपची विचारधारा लोकांपर्यंत पोहचवणे आवश्यक आहे. त्यातुनच निवडणुका जिंकता येतात.

जोश मध्ये निवडणूक जिंकता येत नाही तर होश मध्ये निवडणूक लढावी लागते. त्यामुळे कामाला लागा.

विरोधकांना हृदय विकाराचे झटके आले पाहिजे असा विजय 2019 मध्ये भाजपला मिळाला पाहिजे.

मुख्यमंत्री काय म्हणाले?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही युती बाबात एक मोठं विधान केलंय. राज्यात युतीचा निर्णय हा भाजपचे अध्यक्ष अमित शहाच घेतील असं ते म्हणाले. "महाराष्ट्रात युती होणार की नाही याची काळजी कार्यकर्त्यांनी करू नये तर त्यांनी कामाला लागावं. राज्यातल्या 48 पैकी 40 जागा जिंकण्याची तयारी ठेवावी." असं आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केलं.

शिवसेनेची प्रतिक्रिया

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमीत शाह यांच्या मस्तवाल आणि उन्मत वक्तव्यावरून त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा पर्दाफाश झाला आहे , शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यानी देशातील हिंदुंच्या मनातील भावना मांडली आणि हर हिंदू की यही पुकार पहले मंदिर फीर सरकार असा नारा दिला.

तो झोंबल्या मुळेच आणि शिवसेनेच्या आसुड ओढण्यामुळेच भाजपच्या पाया खालची जमीन सरकली आणि आता भाजप नेत्यांच्या जीभा ही सरकू लागल्या , एकंदर चांगलेच झाले , भाजपला हिंदुत्व मानणारे नको असेच दिसते आहे.

5 राज्यांच्या निकलानंतर तसेही भाजपचे अवसान गळले आहेच , भारतीय जनतेने त्याना त्यांची जागा दाखवायला सुरुवात केली आहेच , लोकसभेच्या महाराष्ट्रात 40 जागा जिंकण्याची वल्गना करुन भाजपने आपली इ व्ही एम् शी युती होणार हे जहीर केलेच आहे , तसेही त्यांच्या अनील गोटे नावाच्या आमदाराने धुळे महानगर पालिकेत यांचे भांडे फोडलेच आहे .

आता होऊंन जाऊद्या , शिवसेना तसेही अंगावर येणाऱ्याला शिंगावर घ्यायला तयार असतेच , येऊ दया अंगावर , होऊ दया सामना , हा महाराष्ट्र तुम्हाला आस्मान दाखवल्या शिवाय राहणार नाही "

First published: January 7, 2019, 7:15 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading