लवकरच होणार 'ठाकरे सरकार'चा मंत्रिमंडळ विस्तार!

लवकरच होणार 'ठाकरे सरकार'चा मंत्रिमंडळ विस्तार!

भाजपला दूर ठेवत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन केली.

  • Share this:

मुंबई, 6 डिसेंबर : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन आठवडा उलटला तरीही अद्याप मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप झालेलं नाही. मात्र आता लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी माहिती काँग्रेस नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

भाजपला दूर ठेवत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन केली. या महाविकास आघाडीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सत्ता स्थापन केली. शिवाजी पार्क इथं उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर इतर 6 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र या मंत्र्यांना अद्याप खातेवाटप करण्यात आलेलं नाही.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षात मंत्रिपदांबाबत मोठी स्पर्धा सुरू असल्यानं खातेवाटपला मुहूर्त मिळत नसल्याचं बोललं जात आहे. मात्र आता ही कोंडी फुटणार असल्याची माहिती आहे. विधीमंडळ अधिवेशनाआधी खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्तार होतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, राज्यात होऊ घातलेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आपल्या समर्थकांचा नंबर लागावा यासाठी राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. काँग्रेसचे विधिमंडळ नेते आणि कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांचाही यामध्ये समावेश होता.

बाळासाहेब थोरात आणि सोनिया गांधी यांच्यात जवळपास तीस मिनिटे झालेल्या भेटीमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचा दावा थोरात यांनी केला आहे. दुसरीकडे, नवनियुक्त विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनीही सोनिया गांधी यांची भेट घेतली. नागपूर मध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वी मंत्रिमंडळ विस्तार व्हावा असा या काँग्रेसच्या नेत्यांचा प्रयत्न आहे.

दरम्यान, आगामी मंत्रिमंडळात काँग्रेसला 13 मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये 9 कॅबिनेट, 4 राज्यमंत्री असणार आहेत.

कॅबिनेटपदासाठी काँग्रेस नेत्यांची संभाव्य नावे

विदर्भ( 2) : विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर

मुंबई(2): वर्षा गायकवाड, अमीन पटेल

मराठवाडा (2): अशोक चव्हाण, अमित देशमुख

पश्चिम महाराष्ट्र (2): सतेज बंटी पाटील, विश्वजित कदम

9 कॅबिनेट मंत्रिपदांसह काँग्रेसला 4 राज्यमंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे.

मंत्रिपदासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीतून कुणाची नावं आहेत चर्चेत?

शिवसेना

दिवाकर रावते, अब्दुल सत्तार, रामदास कदम, तानाजी सावंत, दीपक केसरकर आणि गुलाबराव पाटील

राष्ट्रवादी

धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, दिलीप वळसे पाटील, मकरंद पाटील आणि राजेश टोपे

उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात कोणत्या नेत्यांनी घेतली आहे मंत्रिपदाची शपथ?

एकनाथ शिंदे

सुभाष देसाई

जयंत पाटील

छगन भुजबळ

बाळासाहेब थोरात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 6, 2019 01:41 PM IST

ताज्या बातम्या